Margao: गोव्यातील धक्कादायक प्रकार, बनावट रहिवासी दाखल्यांच्या आधारे लग्न नोंदणी; वकिलांनी वेधलं पोलिसांचं लक्ष

Goa Marriages With Fake Residence Certificates: काही तोतयांकडून हे प्रकार होतात. त्‍यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घ्‍यावी, अशी मागणी केली आहे.
Fake Marriage
Indian MarriageDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: मडगावच्‍या सब-रजिस्‍ट्रार कार्यालयात बनावट रहिवासी दाखले सादर करून लग्‍नाच्‍या नोंदणी केल्‍या जात असून, यासंबंधी काही प्रकरणे उजेडात आल्‍यानंतर सब-रजिस्‍ट्रार कार्यालयाने फातोर्डा पोलिसांत तक्रारीही दिल्‍या. मात्र, अजूनही पोलिसांनी त्‍या तक्रारींकडे आवश्‍‍यक त्‍या गांभीर्याने पाहिलेल्‍या नाही, याकडे दक्षिण गोवा वकील संघटनेने पोलिस अधीक्षकांचे लक्ष वेधले.

काही तोतयांकडून हे प्रकार होतात. त्‍यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घ्‍यावी, अशी मागणी केली आहे. दक्षिण गोवा वकील संघटनेचे अध्‍यक्ष प्रसाद नाईक यांनी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांना लिहिलेल्‍या पत्रात या गंभीर बाबींकडे लक्ष वेधले आहे.

मडगाव सब-रजिस्‍ट्रार कार्यालयात अशी तीन-चार प्रकरणे उघडकीस आली आहेत. रजिस्‍ट्रार कार्यालयातच काही तोतया एजंट वावरत असून, ते लोकांना स्‍वत:ची ओळख वकील म्‍हणून करून देतात आणि असे बनावट दाखले तयार करून त्‍यांच्‍या लग्‍नाच्‍या नोंदणी करून देतात याकडे लक्ष वेधले आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्‍याची गरज त्‍यांनी व्‍यक्‍त केली आहे.

Fake Marriage
Viral Video: विदेशी वधू, भारतीय वर! हनीमूनसाठी कपल पोहोचलं गोव्याच्या किनाऱ्यावर, पाहा व्हिडिओ

कुणाचा आशीर्वाद?

गोव्‍यात लग्‍नाची नोंदणी करायची असल्‍यास वधू किंवा वरापैकी एकजण गोव्‍यातील रहिवासी असण्‍याची गरज आहे. मात्र, असे नसतानाही या नोंदणी होत आहेत. या बेकायदेशीरपणाला कुणाचा तरी आशीर्वाद असावा, अशी शंका उपस्‍थित करून सखोल चौकशी व्‍हावी आणि हा बेकायदेशीरपणा बंद व्‍हावा, अशी मागणी त्‍यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa unregistered homestays action
Goa Congress Party Registration Dispute
Goa Registration Amendment Bill 2026
Goa Transport Department Action
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com