Margao Municipal Council Gomantak Digital Team
गोवा

Margao Municipal Council: मडगाव पालिकेतील नोकरभरती प्रक्रिया रद्द करण्याची नोटीस; आमदार दिगंबर कामतांना धक्का

Margao Municipal Council: पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

Akshay Nirmale

Margao Municipal Council: भाजपशासित मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी गौरीश सांखवाळकर यांनी बुधवारी पालिकेची नोकरभरती प्रक्रिया मागे घेण्याची नोटीस बजावली आहे.

10 ऑगस्ट रोजी ही भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय झाला होता. 8 एलडीसी, 1 गवंडी आणि 34 कामगारांसह 43 पदांसाठी ही नोकरभरती होणार होती.

दरम्यान, ही नोकरभरती प्रक्रिया रद्द करणे हा मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना धक्का असल्याचे मानले जात आहे.

MMC मुख्याधिकाऱ्यांनी बुधवारी नोटीस जारी केली. त्यामध्ये म्हटले आहे की, 11 ऑगस्ट रोजी स्थानिक दैनिकांमध्ये नोकरभरतीची जाहीरात प्रकाशित झाली होती ती मागे घेण्यात आली आहे आणि ती रद्द करण्यात आली आहे. नगरविकास संचालक गुरुदास पिळर्णकर यांनीही या दुजोरा दिला.

मडगावमधील राजकारणावर या घडामोडींचा थेट परिणाम होणार आहे. पालिकेत 11 महिन्यांपासून भाजपची सत्ता आहे.

मडगाव नगराध्यक्षपदाच्या 12 ऑक्टोबरच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देण्याच्या बदल्यात, दोन सत्ताधारी नगरसेवकांच्या बंधुंना लोअर डिव्हिजनल लिपिक (LDCs) म्हणून भरती करण्याचे वचन देण्यात आले होते, असे समजते.

त्यामुळे भरती प्रक्रिया रद्द करण्याची नोटीस पालिकेतील सत्ताधारी गटालाही धक्का मानली जात आहे.

मुख्याधिकारी सांखवाळकर यांनी नगरविकास संचालकांच्या निर्देशांचे पालन करणे ही निव्वळ प्रशासकीय बाब असून, निर्देशांचे पालन करण्याशिवाय पर्याय नसल्याची भूमिका मांडल्याचे समजते.

नगरविकास मंत्री विश्वजित राणे यांच्या निर्देशानंतर नगरविकास संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी 24 ऑगस्ट रोजी पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना पत्र पाठवून नगरपरिषदांमधील सर्व नोकरभरती एकतर नगरविकास विभागातर्फे किंवा कर्मचारी निवड आयोगाद्वारे करण्यात येईल, असे म्हटले होते.

दरम्यान भरती प्रक्रिया रद्द करण्याचे पत्र पाठवल्यापासून आमदार दिगंबर कामत यांनी सत्ताधारी नगरसेवकांना सरकार निर्णय मागे घेईल, असे सांगितले होते.

याबाबत मंत्री विश्वजीत राणेंशी चर्चा झाली असून भरती प्रक्रिया रद्द करण्यासाठी पाठवलेले पत्र मागे घेण्याबाबत नगरविकास संचालकांकडून निर्णय अपेक्षित असल्याचे कामत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते.

नगरविकास मंत्र्यांनी त्याबाबत दिलेले आदेश मागे घेतलेले नसल्याचे सांगत गुरुदास पिळर्णकर यांनी मात्र, एमएमसीला पाठवलेले पत्र मागे घेण्यास नकार दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Raj Bhavan Name Change: गोव्यात ऐतिहासिक निर्णय! 'राजभवन' आता ओळखले जाणार 'लोकभवन' नावाने; राज्यपालांनी पुसली वसाहतवादी ओळख

Cyber Fraud: 'अनन्या'च्या जाळ्यात अडकला एसबीआय क्लर्क, फेसबुकवरची एक फ्रेंड रिक्वेस्ट अन् 92 लाखांचा गंडा; काय नेमकं प्रकरण?

बेतुल ONGC परिसरात अग्नितांडव! वेल्डिंगच्या ठिणगीमुळे भीषण आग; प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

IND vs SA 4th T20: 'तीन पोती गहू विकून आलो होतो...', भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द झाल्याने चाहत्याचा टाहो; BCCI वर टीकेची झोड VIDEO

Viral Video: ब्रेकअप झालं अन् तिनं चक्क Chat GPT सोबत केलं लग्न; AI पार्टनरच्या प्रेमात बुडाली जपानी तरुणी Watch

SCROLL FOR NEXT