Madgaon municipal Council Dainik Gomantak
गोवा

शेतीमध्ये सांडपाणी सोडणाऱ्या हॉटेल्सना कारणे दाखवा नोटीस

सांडपाणी शेतीमध्ये सोडल्याप्रकरणी 5000 रुपयांचा दंड आकारण्याचा मडगाव पालिकेचा इशारा

दैनिक गोमन्तक

मडगाव : हॉटेलमधील सांडपाणी शेतीमध्ये सोडल्याप्रकरणी मडगाव महापालिकेने काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या हॉटेल्सकडून सांडपाणी आणि कचऱ्याची विल्हेवाट साळपे तलावाशेजारील शेतीच्या जागेमध्ये केली जात असल्याचं निदर्शनास आल्याने प्रशासनाने नोटीस जारी केली आहे. रातवाडो, नावेली येथील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये पाणी सोडलं जात असल्याचं निदर्शनास आणून दिल्यानंतर ही कारवाई केल्याचं मडगाव महापालिकेचे मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी स्पष्ट केलं आहे.

प्रशासनाने शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर तपासणी सुरु केली. यात अल सिव्हिल रेस्टॉरन्टमधून सांडपाणी नाल्यावाटे सोडलं जात असल्याचं निदर्शनास आलं. जे पुढे जाऊन शेतीत घुसतं आणि शेतीचं यामुळे नुकसान होतं. या सांडपाण्यामुळे नावेलीतील साळ तलावही प्रदूषित होत असल्याचं समोर आलं आहे. या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधीचं वातावरण पसरलं असून प्रदूषणामुळे (Pollution) पर्यावरणाचाही ऱ्हास होत असल्याचं चित्र आहे.

गोवा (Goa) महापालिका कायदा 1968 आणि गोवा सार्वजनिक आरोग्य कायदा 1985 अंतर्गत या हॉटेल्सना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सांडपाणी शेतीमध्ये आणि साळपे तलावात सोडल्याप्रकरणी 5000 रुपयांचा दंड का आकारू नये अशी विचारणा नोटीसमधून करण्यात आली आहे. मुख्याधिकाऱ्यांनी आरोग्य अधिकारी आणि सहाय्यक अभियंत्यांना सांडपाण्याची कनेक्शन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT