मयेतील रस्त्यावरून वाहतूक नको!

बैठक निष्फळ: मयेवासीयांचा विरोध; आंदोलनाचा इशारा
Mineral truck transport
Mineral truck transportDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: गावातील अंतर्गत रस्त्याने नियमबाह्य खनिज वाहतूक नकोच. या भूमिकेशी मयेवासीय ठाम राहिल्याने आज (सोमवारी) डिचोलीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या संयुक्त बैठकीत खनिज वाहतुकीसंदर्भात कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नसल्याने बैठक निष्फळ ठरली आहे.

मयेतील अंतर्गत रस्त्यावरून बेकायदा खनिज वाहतूक सुरू झाल्यास ती रोखून धरण्यात येईल. पोलिस बळाचा वापर करून खनिज वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास तोही हाणून पाडण्यात येईल, असा इशारा मयेवासीयांनी दिला आहे. त्यामुळे मयेतील खनिज वाहतुकीसमोरील संकट कायम आहे.

Mineral truck transport
दहशतवाद्यांकडून स्थानिक नागरिकाची हत्या

वादाचा विषय ठरलेल्या आणि मयेवासीयांचा वाढता विरोध असलेल्या खनिज वाहतूक विषयी तोडगा काढण्यासाठी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या निर्देशानुसार डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी आज (सोमवारी) आपल्या कार्यालयात संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीस मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर, मयेच्या सरपंच सीमा आरोंदेकर, उपसरपंच संतोष गडेकर, पंच तुळशीदास चोडणकर, विश्वास चोडणकर आणि विजय पोळे यांच्यासह मये भू-विमोचन नागरिक समितीचे सखाराम पेडणेकर, कालिदास कवळेकर, दयानंद कारबोटकर, यशवंत कारभाटकर, अजित सावंत आदी नागरिक तसेच खनिज वाहतूक कंत्राटदार उपस्थित होते.

बैठक निष्फळ

नियमबाह्य खनिज वाहतुकीविरोधात रस्त्यावर उतरल्यास लोकांवर कारवाई होते. तर खनिज वाहतुकीविरोधात कारवाई का होत नाही० असा प्रश्न बैठकीत उपस्थित करण्यात आला. अन्य कोणत्याही मार्गाने करा. मात्र मये गावातील अंतर्गत रस्त्याने खनिज वाहतूक नकोच. या भूमिकेला मयेवासीय चिकटून राहिले. त्यामुळे उपजिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेली बैठक निष्फळ झाल्यातच जमा आहे.

Mineral truck transport
उत्तराखंडमध्ये पुष्करसिंह धामी; मणिपूरमध्ये बीरेन सिंह

वाहतूक नियमबाह्य असल्याचा दावा

बैठकीत खनिज वाहतुकीमुळे भेडसावणाऱ्या समस्या मयेवासीयांनी मांडल्या. ई-लिलावाअंतर्गत पैरा येथील चौगुले खाणीवरून वाहतूक करणाऱ्या खनिजाच्या साठ्याचे प्रमाण कमी आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. स्थानिक ट्रकांना काम देण्याचा प्रस्तावही या बैठकीत पुढे आला. मात्र अंतर्गत रस्त्याने होणारी खनिज वाहतूक नियमबाह्य असल्याचा दावा करून उपस्थित मयेवासीयांनी प्रस्ताव धुडकावून लावला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com