Margao Municipal Council  Dainik Gomantak
गोवा

Margao Municipal Council : वित्त आयोगाचा पैसा पडूनच! निधी न वापरल्याने मडगाव पालिका अडचणीत

45 कोटींपैकी केवळ 5.62 कोटींच्या निधीचाच झाला वापर

दैनिक गोमन्तक

मडगाव नगरपालिकेला 14व्या केंद्रिय वित्त आयोगाकडून 2013 -2017 या कालावधीसाठी 34.87 कोटी रुपये तर 15व्या वित्त आयोगाखाली 2020-2022 या कालावधीसाठी 10.08 कोटी रुपये मिळून एकूण शहराच्या विकासासाठी 44.95 कोटी रुपये मंजूर झाले होते. पण नगरसेवकांनी या निधीचा वापर करणे गंभीरपणे न घेतल्याने म्हणा किंवा नगरपालिकेतील प्रशासनाच्या अज्ञानामुळे म्हणा, त्यातील केवळ 5.62 कोटी निधीचा वापर करण्यात आला.

नगरपालिका प्रशासन संचालनालयाचे संचालक गुरुदास पिळकर्णच्या मते 14 व्या व 15 व्या वित्त आयोग निधीचा वापर न करणारी मडगाव ही एकमेव अ दर्जाची नगरपालिका आहे. गटारे, नाल्यांची दुरुस्ती व वाहन खरेदीसाठी वारंवार हा निधी वापरता येत नाही. पालिकेला काहीतरी नाविन्यपूर्ण अशी विकासयोजना तयार करावी लागेल. तसेच जोपर्यंत 14 व्या वित्त आयोगातील निधीच्या वापराचा ऑडिटेड हिशोब सादर होत नाही, तोपर्यंत 15व्या वित्त आयोग निधीच्या वापरासाठी तांत्रिक मान्यता देता येणार नाही.

पालिकेचे वाहन खरेदीचे प्रस्ताव पडून

पालिकेचे नगरपालिका प्रशासन संचालनालयाकडे जेसीबी व वाहने खरेदी करण्यासाठीचे 1 कोटी 20 लाख रुपयांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पडून आहेत. दैनंदिन कचरा गोळा करणाऱ्या कंत्राट कामावर खर्च करण्याचा दुसरा प्रस्ताव आहे. कचरा गोळा करण्याच्या निविदा लवकरच जारी करण्यात येतील. त्याच प्रमाणे 14 व्या वित्त आयोगाकडून मंजूर झालेला निधी वर्षाला 2.75 कोटी या प्रमाणे खर्च केला जाईल,असे सूत्रांनी सांगितले.

निधीसाठी लवकरच प्रस्ताव

मुख्याधिकारी मानुएल बार्रेटो यांनी सांगितले, की नगरपालिका सर्व प्रक्रिया पूर्ण करुनच हा निधी वापरेल. शिवाय हा निधी निकषाप्रमाणे वापरण्यासाठी कौन्सिलला प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहे. शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी आरोप केला आहे, की नगरसेवकांमध्ये असलेल्या दूरदृष्टीच्या अभावामुळेच कोट्यवधी रुपयांचा निधी वापराविना पडून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालचा मुक्काम कारागृहातच! सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, अंतरिम जामिनाची फेटाळली मागणी

Cabinet Decisions: उज्ज्वला योजनेपासून 'संजीवनी' साखर कारखान्यापर्यंत; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय, CM सावंतांची माहिती

Military Plane Crash: लँडिंग स्ट्रिप नसताना पत्करला इमर्जन्सी लँडिंगचा धोका; भीषण विमान अपघातात 14 जणांचा जागीच मृत्यू VIDEO

Goa Water Storage: धरणे तुडुंब; साळावली-आमठाणे शंभर टक्के, बहुतांश धरणांत 90 टक्क्यांहून अधिक साठा; चापोलीत केवळ 74 टक्के

टॅक्सी भाड्यात सुधारणा, किमान दर 300 रुपये; पिवळ्या-काळ्या, टुरिस्ट टॅक्सींचे दर वाढले: शनिवारपासून नव्या भाडेरचनेनुसार प्रवास

SCROLL FOR NEXT