मडगाव: शुक्रवारी लागलेल्या आगीत सोनसोडो येथील बॅलिंग मशीन आणि पॉवर लॉजिस्टिक नष्ट झाल्यामुळे, मडगाव नगरपरिषदेने गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ (GWMC) चे दरवाजे ठोठावले असून सुका कचरा शहरातुन तात्पुरता GWMC च्या प्लांटमध्ये हलवण्याची विनंती केली आहे. (Margao Municipal Council has knocked doors of the Goa Waste Management Corporation in Sonsodo case)
या संदर्भात, नागरी संस्थेने गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला दुसरे पत्र काढून पाठवले असुन, मडगाव नगरपरिषदने, मडगाव (Margao) येथून गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ, साळीगाव येथे दररोज सुमारे 10 टन सुका कचरा वाहतूक करण्यासाठी एनओसी मागितली आहे.
GWMC आणि GSPCB च्या सदस्य सचिवांना स्वतंत्र पत्र लिहून, एमएमसीचे मुख्य अधिकारी अग्नेलो फर्नांडिस यांनी शुक्रवारच्या घटनेचे गांभीर्य लक्षात आणुन दिले. दुपारी 1 वाजता वीज विभागाची हाय टेंशन लाइन तुटून सोनसोडो येथे शॉर्ट सर्किटमुळे मोठी आग लागली होती. आगीच्या दुर्घटनेमुळे, बेलिंग मशीन आणि इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर आगीमुळे खराब झाल्यामुळे कौन्सिलला सोनसोडो ट्रीटमेंट प्लांटमध्ये सुका कचरा उचलणे शक्य नाही, या गोष्टीची कल्पना त्यांनी दिली.
एमएमसीचे मुख्य अधिकारी पुढे म्हणाले की, परिषदेने गोवा (Goa) राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांना गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनला दररोज 10 टन सुका कचरा तात्पुरता हलविण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले की, प्राथमिक अहवालानुसार शुक्रवारच्या आगीच्या घटनेत 40 लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
"या घटनेत ट्रान्सफॉर्मर आणि इतर विद्युत उपकरणे, एक बॅलिंग मशीन खराब झाले आहे. नासधूस झाल्यामुळे सुका कचरा संकलनावर परिणाम झाला आहे. सोनसोडो येथील वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागेल,” अशी माहिती त्यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.