Digambar Kamat  Dainik Gomantak
गोवा

Digambar Kamat: आमदार दिगंबर कामत यांना पुन्हा आठवला 'देव'; वाचा काय म्हणाले...

भाजपमध्ये येऊन आठ महिने उलटले तरी मंत्रीपद नाही

Akshay Nirmale

Digambar Kamat: ज्येष्ठ आमदार आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी गतवर्षी काँग्रेस सोडल्यानंतर अजब वक्तव्य केले होते. देवाला विचारूनच मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असे ते म्हणाले होते. दरम्यान, नुकतेच आमदार कामत यांना पुन्हा 'देव' आठवला आहे.

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना कामत यांनी पुन्हा देवाची आठवण काढल्याने तिथे हास्याचे फव्वारे उडाले.

दिगंबर कामत यांना मंत्रीपद मिळणार याबाबतच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून गोव्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तथापि, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. हाच धागा पकडून कामत यांना पत्रकारांनी छेडले.

पत्रकारांनी कामत यांना तुम्ही मंत्री कधी होणार, असे विचारले. त्यावर कामत म्हणाले की, देवाला विचारा. केवळ तोच या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो. त्यांच्या या उत्तरानंतर उपस्थितांना हसु आवरेना. तसेच कामत यांच्या जुन्या वक्तव्यालाही त्यामुळे उजाळा मिळाला.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, रूडॉल्फ फर्नांडिस, संकल्प आमोणकर, दिलायला लोबो, मायकल लोबो, राजेश फळदेसाई, केदार नाईक या आठ आमदारांनी काँग्रेस सोडून भाजपममध्ये प्रवेश केला होता.

तेव्हा बोलताना कामत यांनी देवाला विचारूनच मी भाजपमध्ये प्रवेश केला, असे वक्तव्य केले होते. कामत म्हणाले होते की, पितृपक्ष भाद्रपद महिन्यात येतो. भाद्रपद हा अतिशय महत्त्वाचा महिना आहे. याचा विचार करून आणि देवाला विचारूनच मी भाजपात प्रवेश केला आहे.

दरम्यान, या आठ पैकी काही आमदारांना मंत्रीपद देण्यात येईल, असे कबुल करण्यात आल्याचे सांगितले जात होते. पण सात-आठ महिने होत आले तरी कुणालाही मंत्रीमंडळात संधी मिळालेली नाही.

तथापि, दिगंबर कामत, तसेच आमदार आलेक्स सिक्वेरा यांच्या नावाची चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT