Margao minor boy Pakistan support video Dainik Gomantak
गोवा

Margao: 'पैसे देतो, लस्सी देतो पाकिस्तानचे समर्थन कर'! मडगावातील अल्पवयीनाचा Video Viral; संतप्त नागरिकांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा 

Margao minor boy Pakistan support video: पोलिस निरीक्षक सूरज सामंत या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. २० सप्टेंबरपूर्वी ही घटना घडली असून तो व्हिडिओ व्हायरल झाला होता.

Sameer Panditrao

मडगाव: मडगावात  अल्पवयीन मुलाला  पैसे आणि लस्सीचे आमिष दाखवून पाकिस्तानचे समर्थन करण्यास सांगून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई करण्यात पोलिस दिरंगाई करीत असल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त े आणि पीडित मुलाचे कुटुंबीय शनिवारी दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयासमोर  एकवटले.

पोलिसांनी संशयितावर  गुन्हा नोंद करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांची भेट घेऊन त्यांनी आपली बाजू  त्यांच्यासमोर  मांडली. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा नोंद केल्याची माहिती मडगाव पोलिसांनी दिली.

पोलिस निरीक्षक सूरज सामंत या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. २०  सप्टेंबरपूर्वी ही घटना घडली असून तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी त्या मुलाच्या काकीने मडगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.

मात्र, कारवाई होत नसल्याने तक्रारदार व सामाजिक कार्यकर्त्यांनी  शनिवारी पोलिसांना जाब विचारून त्वरित कारवाईची  मागणी केली.  पोलिस कोणाच्या  दबावाखाली आहेत का, असा प्रश्‍न करत धार्मिक सलोखा बिघडविण्याचे हे कृत्य असून पोलिसांनी त्वरित संशयितावर  कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सावियो कुतिन्हो, अझीम शेख तसेच अन्य  सामाजिक कार्यकर्त्यांनी  या प्रकाराचा निषेध नोंदविला. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खडकात अडकलेली क्रूझ बोट, वार्का पॅराग्लायडिंग प्रकरणाची पर्यटन मंत्र्यांकडून गंभीर दखल; मालकांना नोटीस

Goa Mining: गोवा सरकारचा मोठा निर्णय! माजी खाणपट्टाधारकांना खनिज विक्रीस परवानगी; ‘डंप पॉलिसी’अंतर्गत परवानगी

Lotulim Shipyard: ..आनीक 2 कामगारांक उपचारावेळार मरण, Video

Electricity Tariff Hike: ऐन दिवाळीत वीज दरवाढीचा शॉक! 1नोव्हेंबरपासून 20% कराचा भुर्दंड; विरोधकांकडून सरकारवर टीकास्त्र

Horoscope: या 5 राशी होणार मालामाल, गुंतवणुकीत फायदा; ‘रूचक राजयोग’ बदलणार आयुष्य

SCROLL FOR NEXT