protest over dumping of garbage  Dainik Gomantak
गोवा

Madgaon Garbage : कचऱ्यामुळे त्रस्त माडेलवासीयांची निदर्शने; मडगाव पालिका कचरा व्यवस्थापनात अपयशी ठरल्याचा आरोप

तात्काळ उपाययोजना न केल्यास न्यायालयात जाण्याचा पालिकेला इशारा

गोमन्तक डिजिटल टीम

Madgaon Garbage : मडगाव आणि फातोर्डा या दोन्ही मतदारसंघांत कचऱ्याची समस्या दिवसेेंदिवस गंभीर होत चालली आहे. आता मडगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीसुद्धा कचऱ्याचे मोठमोठे ढीग दिसू लागले असून दुर्गंधीचा त्रास स्थानिक लोकांना होत आहे.

त्याविरुद्ध लोकांनी आवाज उठविण्याचे प्रकारही वाढले आहेत. मडगावच्या केटीसी बस स्टॅण्डलगत माडेल प्रभागात अशाच प्रकारचे कचऱ्याचे ढीग तयार झाले असून त्याविरुद्ध माडेलच्या रहिवाशांनी बुधवारी निदर्शने केली.

मडगावची नगरपालिका कचरा व्यवस्थापनात अपयशी ठरली आहे. केटीसी बस स्टॅण्डजवळच मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. येथे कदंब महामंडळाच्या बसेस थांबत असल्याने त्यांच्या मागे कचऱ्याचे ढीग लागतात. त्यामुळे बसच्या आडून हा कचरा दिसत नाही, असे येथील रहिवासी फेलिक्स रॉड्रिग्स यांनी सांगितले.

आणखी एक रहिवासी मारिया यांनी सांगितले की, या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे दुर्गंधीचा त्रास सतावतोच, शिवाय संध्याकाळी डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव जाणवतो. त्यामुळे मुलांना बाहेर उघड्यावर खेळता येत नाही. डेंग्यू किंवा मलेरियासारखे आजार होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

इथे कचरा टाकण्यास आमचा विरोध असतानाही नगरपालिका प्रशासन येथे कचरा टाकते. आम्ही त्यांना कित्येकदा हा कचरा उचलण्यास सांगितले आहे; पण नगरपालिका काहीच कार्यवाही करत नाही, असा आरोप मिलाग्रीस फर्नांडिस यांनी केला.

...अन्यथा न्यायालयात जाणार

नगरपालिका प्रशासन शहर स्वच्छ करण्यासाठी आहे की घाणेरडे करण्यासाठी, हेच कळत नाही. आम्ही येथील कचरा ताबडतोब उचलण्यासाठी नगरपालिकेला निवेदन देणार आहोत. जर नगरपालिकेने तात्काळ उपाययोजना केली नाही तर मग न्यायालयात धाव घ्यावी लागेल, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT