Crime News Dainik Gomantak
गोवा

Margao Crime: 'रुबेन वेर्णेकर' मुख्‍य सूत्रधार असण्‍याची शक्‍यता! रायकर अपहरणप्रकरणी पोलिसांचा दावा

Margao Abduction Case: आके येथील बेबी ब्‍लॉझम या शाळेत शिकणाऱ्या आपल्‍या मुलाला शाळेत पोहोचवून परत येताना बुधवारी सकाळी रायकर यांचा अपहरणाचा प्रयत्‍न झाला होता. ३ अज्ञात अपहरणकर्त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून त्‍याला बरोबर आणलेल्‍या गाडीत कोंबण्‍याचा प्रयत्‍न केला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Kidnapping Case

मडगाव: येथील सोन्‍याचे व्‍यावसायिक कुणाल रायकर यांचा बुधवारी जो अपहरणाचा प्रयत्‍न झाला होता, त्‍या प्रकरणात रूबेन वेर्णेकर हाच मुख्‍य सूत्रधार असण्‍याची शक्‍यता पोलिसांनी व्‍यक्‍त केली आहे. या अपहरण प्रकरणासाठी जी शस्‍त्रे वापरली ती अजूनही जप्‍त करायची बाकी असल्‍याने वेर्णेकर याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळून लावावा, अशी मागणी मडगाव पोलिसांनी केली आहे.

आके येथील बेबी ब्‍लॉझम या शाळेत शिकणाऱ्या आपल्‍या मुलाला शाळेत पोहोचवून परत येताना बुधवारी सकाळी रायकर यांचा अपहरणाचा प्रयत्‍न झाला होता. ३ अज्ञात अपहरणकर्त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून त्‍याला बरोबर आणलेल्‍या गाडीत कोंबण्‍याचा प्रयत्‍न केला होता. मात्र त्‍यावेळी रायकर यांनी झटापट केल्‍याने अपहरणकर्त्यांची हातातली बंदुकीची मॅगझीन गळून खाली पडली होती, त्‍यामुळे या अपहरणाचा प्रयत्‍न फसला होता.

या प्रकरणात आपल्‍याला अटक होण्‍याच्‍या भीतीने रूबेन वेर्णेकर याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून गुरुवारी या अर्जावर दक्षिण गोव्‍याच्‍या अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश क्षमा जोशी यांच्‍यासमोर सुनावणी झाली. दोन्‍ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्‍यानंतर या अर्जावरील निकाल शुक्रवारपर्यंत राखून ठेवण्‍यात आला.

पोलिसांकडून या जामीन अर्जाला विरोध करताना एका दुकानाच्‍या सेल डीड करण्‍याच्‍या वरून कुणाल व रूबेन यांच्‍यात वाद चालू होता. त्‍या दुकानाची सेलडीड करावी यासाठी रूबेन कुणालवर दबाव आणत होता.

ही सर्व पार्श्वभूमी पाहता, रूबेननेच भाडोत्री गुंड आणून रायकर यांचा अपहरण करण्‍याचा प्रयत्‍न केला असावा अशी शक्‍यता पोलिसांनी व्‍यक्‍त केली आहे. सध्‍या या प्रकरणाचा तपास प्राथमिक अवस्‍थेत असल्‍याने आणि या अपहरणात नेमका कुणाचा हात आहे हे जाणून घेण्‍यासाठी वेर्णेकर याला अटक करून त्‍याची चौकशी करणे गरजेचे असल्‍याचे म्‍हटले आहे.

मागच्‍या काही दिवसात वेर्णेकर याने कुणाकुणाशी संपर्क साधला हे तपासण्‍यासाठी त्‍याच्‍या फोनचे कॉल डिटेल्‍स मागितले आहेत. संशयितावर अपहरण करण्‍याचा प्रयत्‍न केल्‍याचा गुन्‍हा नोंद केला असून त्‍याला जामीनमुक्‍त केल्‍यास तो पुन्‍हा एकदा रायकर यांना तसेच अन्‍य साक्षीदारांना धमकावण्‍याची शक्‍यता आहे असे या जामिनाला विरोध करताना न्‍यायालयात सादर केलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे.

आरोप फक्‍त शक्‍यतेच्‍या आधारावर, वेर्णेकरच्या वकीलाचा दावा

दरम्‍यान, आपल्‍या अशिलावर जो आरोप ठेवण्‍यात आला आहे तो फक्‍त शक्‍यतेच्‍या आधारावर असून त्‍यामागे काही ठोस पुरावे नाहीत असा युक्तिवाद वेर्णेकर यांची बाजू मांडताना ॲड. अमेय प्रभुदेसाई यांनी केला. ही घटना झाल्‍यानंतर वेर्णेकर याला मडगाव पोलिसांनी चौकशीसाठी ताब्‍यात घेतले होते. काल संपूर्ण दिवस तो पोलिस स्‍थानकावर होता.

पोलिसांच्‍या तपासात आपला अशील पूर्ण सहकार्य करत आहे. पोलिसांच्‍या ताब्‍यात असतानाही पोलिसांनी त्‍याला अटक केलेली नाही. यावरुन फक्‍त शक्‍यतेच्‍या आधारावर त्‍याला या प्रकरणात गोवले गेले आहे हे स्‍पष्‍ट होते असे ॲड. प्रभुदेसाई यांनी म्‍हटले. या प्रकरणात मडगावचे पोलिस उपनिरीक्षक स्‍वदेश देसाई हे तपास करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यात ATS आणि NSG च्या विशेष दहशतवादविरोधी सरावाची यशस्वी सांगता!

Goa Cyber Crime: फॉरेक्स ट्रेडिंगच्या बहाण्याने 35 लाखांना गंडा लावणारा केरळचा तरुण गजाआड; गोवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

Yuri Alemao: एस्कॉर्ट संकेतस्थळांवरून आलेमाव यांची सरकारवर घणाघाती टीका! पोलिसांनी फेटाळला आरोप

CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांचा धडाका! आदिवासी कल्याणच्या कामगिरीचा घेतला आढावा

IRONMAN 70.3: रविवारपासून गोव्यात रंगणार 'आयर्नमॅन'चा थरार! 50 जीवरक्षक, AI रोबोट्सच्या साहाय्याने दृष्टी ठेवणार 'नजर'

SCROLL FOR NEXT