Margao Karwar highway toll Dainik Gomantak
गोवा

Goa Protest: '..ही लूट थांबवा'! शेळ- लोलये टोल नाक्यावर नागरिकांचे आंदोलन; ई-चलनच्या नावाखाली वसुली होत असल्याचा आरोप

Shel Loliem: या नाक्यापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर पोळे पोलिस, वाहतूक खाते यांचा तपासणी नाका असताना या नाक्याची गरज काय, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोण: मडगाव - कारवार हमरस्त्यावर शेळ- लोलये येथे उभारलेल्या टोल नाक्यावर ई-चलनच्या नावाखाली वाहनचालकांची लूट चालवल्याचा आरोप करत नागरिकांनी आंदोलन छेडून टोल नाका बंद करण्यास भाग पाडले.

सर्व कागदपत्रे असूनही या नाक्यावर वाहनचालकांना विनाकारण सतावण्यात येते. या ठिकाणी स्वयंचलित यंत्रणा बसवली आहे. वाहन यंत्रणेसमोर येताच वाहनाचा विमा, प्रदूषण वैधता दाखला, वाहनाची वैध कागदपत्रे, रस्ता कर यासंबंधी तपासणी करून काही त्रुटी असल्यास ई-चलन जनरेट करते. यातून स्थानिकांची सुटका होत नाही.

या स्वयंचलित यंत्रणेत दोष आहेत. या नाक्यापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर पोळे पोलिस, वाहतूक खाते यांचा तपासणी नाका असताना या नाक्याची गरज काय, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. यावेळी मामलेदार गजेश शिरोडकर, पोलिस उपअधीक्षक नीलेश राणे, वाहतूक खात्याचे उपसंचालक राजेश नाईक, साहाय्यक संचालक निक्सन सुवारीस, इन्फोटेक कॉर्पोरेशनचे वर्गीस, वाहतूक उपअधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई, गौतम साळुंखे, सचिन पानळकर यांनी आंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.

हा चेक नाका अरूंद हमरस्त्यावर असून या ठिकाणी हमरस्त्याला जोडणारे दोन अंतर्गत रस्ते आहेत. वाहनांची तपासणी करताना हमरस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांचा वापर करणाऱ्या रहिवाशांना तासनतास ताटकळत राहावे लागते. त्यामुळे हा तपासणी नाका पोळे येथे हलवावा, अशी मागणी करणारे निवेदन नगरसेवक शुभम कोमरपंत यांनी हमरस्ता विभागाच्या साहाय्यक अभियंत्यांना दिले आहे.

मोलेतही वाहनचालकांना नाहक त्रास

कर्नाटकातून गोव्यात येताना मोलेम येथे ‘नंबर प्लेट’, प्रदूषण प्रमाणपत्राची तपासणी केली जाते. कर्नाटकात घेतलेले प्रदूषणविषयक प्रमाणपत्र ऑनलाईन तपासणी करताना नोंद दिसत नाही. त्यामुळे बाहेरील वाहनांना दंड आकारला जातो.

वाहन मालकाला दहा हजार पाचशेचा ‘ऑनलाइन’ दंड आकारला जातो, त्यामुळे गोव्यात येणाऱ्या पर्यटक वाहनांना मोठा फटका बसत आहे. इतर राज्यातून गोवा हद्दीत जाणाऱ्या वाहनधारकांना मोठी डोकेदुखी बनली आहे, तर वास्तविक कायद्यानुसार एखाद्या वाहनाचे प्रदूषणविषयक प्रमाणपत्र नसल्यास वाहनाला सात दिवसाचा अवधी देण्यात येतो. परंतु वाहन चालकांना थेट दंड आकारण्यात येत आहे. यासंदर्भात चौकशी करण्यासाठी मडगाव गाठावे लागते. शिवाय सुटीच्या दिवशी कार्यालय बंद असल्यामुळे गोव्यात ये-जा करणे कठीण होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: पाणी जपून वापरा; पर्वरीत दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Mandrem: मांद्रेतील जमिनी विकू देणार नाही! सरपंच फर्नांडिस यांचा निर्धार; भूमिपुत्रांसाठी जागा सुरक्षित ठेवण्याचे आवाहन

Goa Congress: जि.पं., विद्यापीठ निवडणुकांमुळे काँग्रेसला नवसंजीवनी! LOP आलेमाव य़ांचे प्रतिपादन; विजयी उमेदवारांचा मडगावात गौरव

Rohit Sharma: "रोहित को बोलिंग दो"! शून्यावर आउट गेला तरी 'हिटमॅन'ची क्रेझ कायम; प्रेक्षकांनी केली गोलंदाजी देण्याची मागणी

अग्रलेख: दिल्लीश्‍वरांचरणी केवळ गोवाच नव्हे तर गोंयकारपणही विक्रीस काढलेल्यांकडून अपेक्षा तरी किती आणि का ठेवायच्या?

SCROLL FOR NEXT