Goa Waste Management Dainik Gomantak
गोवा

Margao Kadamb Station : ‘कदंब’ स्थानक नव्हे ‘कचरा आगार’! मडगावात प्रवासी त्रस्त; कंत्राटदार नियुक्तीची होतेय मागणी

Margao Kadamba Bus Stand : मडगावचे कदंब बस स्थानक हे दक्षिण गोव्यातील एक प्रमुख बस स्थानक असुन इथे दिवसभरात लाखो प्रवाशांची ये-जा असते. शिवाय इतर राज्यातील पर्यटकही इथे येतात.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: मडगावचे कदंब बस स्थानक हे दक्षिण गोव्यातील एक प्रमुख बस स्थानक असुन इथे दिवसभरात लाखो प्रवाशांची ये-जा असते. शिवाय इतर राज्यातील पर्यटकही इथे येतात. मात्र, त्यांचे स्वागत कचऱ्याच्या ढिगाऱ्याने होते ही वस्तुस्थिती आहे. या कदंब स्थानकावर शिस्त नाही, तसेच देखरेख होत नाही.

या संदर्भात समाजसेवक योगेश नागवेकर यांनी सांगितले की, केवळ नवीन बसेस घेणे व जुन्या बसेस दूर करणे हे एकच काम कदंब बस वाहतूक महामंडळाचे नाही. या बस स्थानकाची देखरेख करणे व कचरा व्यवस्थापन करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. नावेलीचे आमदार तथा कदंबचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी आम्ही करीत आहोत, असेही नागवेकर यांनी सांगितले.

बसचे चालक वगैरे इथेच आंघोळ करतात. त्याच बाजूने महिला ये जा करीत असतात. काही ठिकाणी मासळी वाहतुकीची वाहनेही ठेवली जातात. त्याचे पाणी वाहत असते. याचा सामान्य लोकांना भयंकर त्रास होत आहे, असे नागवेकर यांनी सांगितले.

फातोर्डेतील रहिवाशी मिलाग्रेस फर्नांडिस म्हणाले, की कचरा व्यवस्थापन व देखरेख करण्यासाठी खास कंत्राटदाराची नियुक्ती करणे आवश्यक आहे. पार्किंग साठी चार व दुचाकी वाहन चालकांकडून फी घेतली जाते. त्यासाठी त्यांना सुविधा पुरविणेही गरजचे नाही का? असा प्रश्न सुद्धा फर्नांडिस यांनी केला.

मडगावला स्वच्छ सुंदर ठेवावे

कोणत्याही शहराचे मुख्य ठिकाण हे तेथील बसस्थानक असते, कारण ते या शहराचे प्रवेशाचे ठिकाण असते. पण तेच जर कचऱ्याने व्यापलेले असेल, तर शहराचे चित्र काय असेल, असा प्रश्‍न पर्यटकांना पडतो. त्यामुळे शहराच्या स्वच्छतेला बसस्थानकापासूनच सुरुवात व्हायला हवी.

निविदा प्रक्रियेचे झाले काय?

गेल्या महिन्यात कदंब बस स्थानकाच्या ३० हजार चौरस मीटर जागेत भव्य दिव्य असे बसस्थानक व व्यापारी संकुल पीपीपी तत्त्वावर बांधण्यासाठी वाहतूक खात्यातर्फे २०५१ कोटी रुपयांच्या निविदा काढण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली होती. त्यानंतर फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी आपल्याला विश्र्वासात न घेता अशा प्रकारचे व्यापारी संकुल उभारण्यास विरोध असेल, असे जाहीर केल्यावर नेमक्या या प्रक्रियेचे काय झाले हे अजून स्पष्ट झालेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT