Margao Court Order Dainik Gomantak
गोवा

Margao Crime: कटकारस्थान रचून सराफाचा केला खून, पुरावे केले नष्ट; CCTV फुटेज पाहण्‍याची न्यायाधीशांनी केली मागणी

Margao jeweller murder case: मडगावातील सराफ यांच्या खून प्रकरणासंबंधी सध्या कोठडीत असलेला रॉड्रिग्स याच्या जामीन अर्जावर निर्णय देण्यापूर्वी सत्र न्यायालय या खून प्रकरणासंबंधी सीसीटीव्ही फुटेज पाहणार आहे.

Sameer Panditrao

मडगाव: मडगावातील सराफ स्वप्नील वाळके (३५) यांच्या खून प्रकरणासंबंधी सध्या कोठडीत असलेला एव्हेडर रॉड्रिग्स याच्या जामीन अर्जावर निर्णय देण्यापूर्वी मडगावचे सत्र न्यायालय या खून प्रकरणासंबंधी सीसीटीव्ही फुटेज पाहणार आहे. शुक्रवारी मडगावच्या सत्र न्यायालयात या खटल्यासंबंधी सुनावणी सुरू असताना दक्षिण गोव्‍याच्‍या प्रधान सत्र न्यायाधीश शेरीन पॉल यांच्या न्यायालयाने ही सूचना केली.

या प्रकरणातील संशयित एव्हेडर रॉड्रिग्स याने आपल्याला जामिनावर सोडावे यासाठी सत्र न्यायालयाकडे अर्ज केलेला आहे. आपल्याला या प्रकरणासंबंधी सीसीटीव्ही फुटेज पाहायचे असून त्यासाठी एव्हेंडर रोड्रिग्स याला पुढील सुनावणीच्यावेळी न्यायालयात प्रत्यक्ष हजर करावे, असे निर्देश न्यायालयाने तुरुंग अधिकाऱ्यांना दिले.

ओंकार पाटील, मुश्ताफा शेख, एव्हेडर रॉड्रिग्स, राहुल कुमार, सनी कुमार आणि कुंदन कुमार हे या खून प्रकरणातील सहा संशयित आहेत. कटकारस्थान रचून खून करणे, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांखाली त्यांच्याविरुद्ध आरोप ठेवलेले आहेत.

संशयित राहुल कुमार, सनी कुमार आणि कुंदन कुमार यांनी स्वप्नील याचा खून करण्यासाठी पिस्तुलाची व्यवस्था केली होती, असा आरोप आहे. मडगाव पोलिस स्थानकाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक सी.एल. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने या खून प्रकरणाचा तपास केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT