Dengue Cases In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Dengue Cases: मडगावात डेंग्यूचे तुरळक प्रमाणात रुग्ण! तातडीने उपाययोजना केल्याचा परिणाम

Margao Dengue Cases: सध्‍या डेंग्‍यूचे रुग्‍ण हे मडगाव आणि जवळच्‍या परिसरात तुरळक प्रमाणात आढळत आहेत. मात्र, एकाच जागी मोठ्या प्रमाणात रुग्‍ण आढळण्‍याचे प्रकार सध्‍या तरी दिसून येत नाही, अशी माहिती मडगाव आरोग्‍य केंद्राचे प्रमुख डॉ. सुकूर क्‍वाद्रूस यांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: सध्‍या डेंग्‍यूचे रुग्‍ण हे मडगाव आणि जवळच्‍या परिसरात तुरळक प्रमाणात आढळत आहेत. मात्र, एकाच जागी मोठ्या प्रमाणात रुग्‍ण आढळण्‍याचे प्रकार सध्‍या तरी दिसून येत नाही, अशी माहिती मडगाव आरोग्‍य केंद्राचे प्रमुख डॉ. सुकूर क्‍वाद्रूस यांनी दिली.

मडगाव आणि जवळपासच्‍या परिसरातील वेगवेगळ्‍या भागांमध्‍ये एकेक रुग्‍ण सापडण्‍याचे प्रकार घडत आहेत. यापूर्वी एकाच ठिकाणी माेठ्या संख्‍येने रुग्‍ण सापडण्‍याचा प्रकार हा अंबाजी-फातोर्डा येथे घडला होता. त्‍यानंतर आम्‍ही तत्‍परतेने उपाययोजना करून या परिसरातील डास पैदास केंद्राचे निवारण केले होते, असे डॉ. क्‍वाद्रूस यांनी सांगितले.

सध्‍या काही रो हाऊसेस असलेल्‍या ठिकाणी एकेक अशाप्रकारे प्रकरणे आढळलेली आहेत. काही दिवसांपूर्वी पाॅवर हाऊसच्‍या ठिकाणी वेगवेगळ्‍या भागांतील तीन-चार डेंग्‍यूचे रुग्‍ण आढळलेले आहेत. या ठिकाणी ठेवलेल्‍या वीज साहित्‍यामध्‍ये डास पैदास केंद्रे सापडली होती. त्‍यांचे त्‍वरित निवारण करण्‍यात आले आहे आणि हे साहित्‍यही आता तिथून हटविण्‍यात आले आहे.

सध्‍या पावसाळी हंगाम समाप्तीकडे असला तरी अधूनमधून कोसळणाऱ्या पावसामुळे परिस्‍थिती बिघडत आहे. त्‍यामुळे डेंग्‍यूचे रुग्‍ण तुरळक प्रमाणात का असेना सापडण्‍यास हातभार लागत आहे, असे डॉ. क्‍वाद्रूस यांनी सांगितले.

लक्षणे कोणती?

डेंग्‍यूवर वेळीच उपचार केले नाहीत तर रुग्‍णाचा जीवही जाऊ शकतो. डेंग्‍यू झाल्‍यावर ताप, डाेकेदुखी, मांस पेशींमध्‍ये वेदना, हाडे आणि जॉईंट्‌समध्‍ये वेदना, मळमळ, उलटी, डाेळे दुखणे, सूज आणि त्‍वचेवर लाल चट्टे अशी लक्षणे दिसतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT