Court Dainik Gomantak
गोवा

Margao Firing: मडगाव गोळीबार प्रकरण; संशयिताला सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

झाडलेल्‍या गोळ्‍या फॉरेन्‍सिक चाचणीसाठी पाठविण्यात येणार

Rajat Sawant

Margao Gunfire Case: मडगाव येथे गुरुवारी रात्री पैशांच्या वादातून पिस्तुलातून गोळ्या झाडल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रसेल डिसोझा (48) या संशयिताला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती.

दरम्यान, शनिवारी एक दिवसाच्या पोलिस कोठडीचा रिमांड संपल्याने त्याला पुन्हा मडगाव न्यायालयात हजर केले असता, त्याला सात दिवसांचा न्यायालयीन कोठडीचा रिमांड देण्यात आला.

संशयित रसेल याने पैशांच्या वादातून जुन्या मार्केटमधील ए-वन खान फास्टफूड सेंटरचे मालक मशीमुल्ला उर्फ लालू खान यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होता. लालू खान पळून गेल्याने ते यातून बालंबाल बचावले.

पैशांच्या देवाणघेवाणीवरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी भडकलेल्या डिसोझाने पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. लालू खान त्यावेळी पळून गेल्याने या हल्ल्यातून ते बचावले.

त्यानंतर डिसोझा स्वतःहून फातोर्डा ठाण्यात पोलिसांना शरण आला. विशेष म्हणजे, मागच्या वर्षी झालेल्या कार्निव्हल परेडमध्ये संशयित रसेल याची ‘किंग मोमो’ म्हणून निवड झाली होती.

दरम्यान या प्रकरणात फाताेर्डा पोलिसांनी जप्‍त केलेले पिस्‍तूल आणि संशयिताने झाडलेल्‍या गोळ्‍या फॉरेन्‍सिक चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT