Margao Firing
Margao Firing Dainik Gomantak

Margao Firing: ‘किंग मोमो’ची सटकली; मडगावात केला गोळीबार

गुन्हा दाखल : एक दिवसाची पोलिस कोठडी
Published on

Gunfiring In Margao: येथील जुन्या मार्केटमधील ए-वन खान फास्टफूड सेंटरचे मालक मशीमुल्ला उर्फ लालू खान यांच्यावर रसेल डिसोझा (४८) याने पैशांच्या वादातून पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. मात्र, ते यातून बालंबाल बचावले. विशेष म्हणजे, मागच्या वर्षी झालेल्या कार्निव्हल परेडमध्ये

रसेल याची ‘किंग मोमो’ म्हणून निवड झाली होती. याप्रकरणी डिसोझाला अटक केली असून एक दिवसाची कोठडी बजावली आहे.

Margao Firing
Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्प; मुदतवाढीसाठी सरकारचा अर्ज

संशयित डिसोझा हा मडगावातील व्यावसायिक असून पूर्वी तो फास्टफूड सेंटर चालवायचा. नंतर ते सेंटर त्याने लालू खान यांना चालवायला दिले. या दुकानाच्या भाडेपट्टी कराराची मुदत संपल्याने ते बंद केले होते.

मात्र, डिपॉझिट म्हणून दिलेले २ लाख रुपये परत करावेत, यासाठी खान यांनी डिसोझाला फोन केला होता. यावेळी दोघांमध्ये वाद होऊन एकमेकांना शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला.

यावेळी भडकलेल्या डिसोझाने पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. लालू खान त्यावेळी पळून गेल्याने या हल्ल्यातून ते बचावले. त्यानंतर डिसोझा स्वतःहून फातोर्डा ठाण्यात पोलिसांना शरण आला.

त्याने झाडलेल्या तीनपैकी एक गोळी दुकानाच्या भिंतीत घुसली, तर दोन गोळ्या जमिनीवर पडल्या. या गोळ्या पोलिसांना पंचनाम्यावेळी सापडल्या. जुन्या मार्केटमध्ये ए-वन खान हे आणखी एक फास्टफूड सेंटर असून तेही लालू खान चालवतो. याच दुकानासमोर गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास डिसोझाने गोळीबार केला.

तीन महिन्यांपासून सुरू होता वाद

रसेल डिसोझा आणि लालू खान यांच्यात गेले तीन महिने पैशांवरून वाद सुरू होता. आपला करार संपला असल्याने डिपॉझिट म्हणून दिलेले २ लाख रुपये परत द्या, असा तगादा खान यांनी लावला होता.मात्र रसेल ते पैसे देत नव्हता.

त्यामुळेच त्यांच्यात तणाव वाढला होता. रसेलला घेतलेले पैसे परत करायची सवय नव्हती. गुरुवारी त्यांच्यात यावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडला. रसेलने ज्या पिस्तुलातून गोळ्या झाडल्या, ते पिस्तूल त्याच्या वडिलांच्या नावावर नोंद होते.

एक वर्षापूर्वी त्याचा वडिलांचे निधन झाले. लालू खान यांना धमकावण्यासाठीच त्याने गोळीबार केला, असे समजते. तथापि, आरजीचे प्रवक्ते तियोतिनो कॉस्टा यांनी गोव्यातील व्यवसायांवर बाहेरच्यांनी कब्जा केल्याने त्यातूनच असे वाद उदभवतात, असे म्हटले आहे.

दोघे बचावले

गुरुवारच्या घटनेत मोबाईलवर बोलता बोलताच डिसोझाने पिस्तुल काढून लालू यांच्या दिशेने रोखले आणि गोळी झाडली. मात्र, लालूने तेथून पळ काढल्याने तो बचावला.

त्यानंतर या रेस्टॉरंटला चिकन पुरवणाऱ्या नईमवर डिसोझाने गोळी झाडली, पण त्यानेही पळ काढल्याने तोही बचावला.

नंतर डिसोझाने रेस्टॉरंटच्या दिशेने तिसरी गोळी झाडली आणि तो तिथून निघून गेला, अशी माहिती लालू यांच्या भावाने दिली.

Margao Firing
Goa Agriculture Land: शेतकरी असाल, तरच मिळेल शेतजमीन; कृषी कार्डधारकांना लाभ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com