नेसाय : ट्रकमध्ये भरलेला अतिरीक्त कचरा दुसऱ्या ट्रक मध्ये हलवित असताना. Dainik Gomantak
गोवा

Margao Garbage: मडगाव पालिकेचे कचऱ्याचे ट्रक अडविले; नेसाय येथील ग्रामस्थ आक्रमक

क्षमतेपेक्षा जास्त कचरा घालून वाहतूक

दैनिक गोमंतक

Margao Garbage: याआधी सूचना देऊनही क्षमतेपेक्षा जास्त माल भरून घेऊन जाणारे मडगाव पालिकेचे सुक्या कचऱ्याचे ट्रक आज, गुरूवारी नेसाय येथे लोकांनी अडविले. शेवटी अतिरिक्त माल खाली करुन तो दुसऱ्या ट्रकमध्ये घालून नेण्याची तयारी दाखविल्यावरच हे ट्रक सोडण्यात आले.

मडगाव शहरातील प्लास्टिक आणि इतर सुका कचरा बेलिंग करण्यासाठीं नेसाय येथील औद्योगिक वसाहतीत नेण्यात येतो. मात्र यापूर्वी हा कचरा कुठलेही आवरण न घालता वाहून नेला जात असल्याने स्थानिकांनी हे ट्रक यापूर्वी अडविले होते.

या बद्दल माहिती देताना पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते फ्रेडी ट्रावासो यांनी सांगीतले, आम्ही या पूर्वी हे कचऱ्याचे ट्रक अडविल्यानंतर हा कचरा ट्रकावर प्लास्टिक आवरण घालून नेण्यात येणार असे आम्हाला आश्वासन देन्यात आले होते.

त्याप्रमाणे हे आवरण घालून ही वाहतूक केली जात होती. मात्र या ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कचरा घालून ही वाहतूक केली जात होती. त्यासाठीच आज हे ट्रक पुन्हा अडविण्यात आले.

शेवटी हा अतिरिक्त कचरा दुसऱ्या गाडीत घालून नेण्याची तयारी दाखविल्यावर हे ट्रक सोडण्यात आले असे ट्रावासो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Love Horoscope Today: रवि योग आणि नीचभंग राजयोगाचा 'या' राशींच्या लव्ह लाईफवर होणार परिणाम!

Taxi Aggregator: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर'बाबत फेरविचार करावा! पायलट संघटनेची मागणी; पारंपरिक व्यावसायिकांना फटका बसण्याची भीती

Yuri Alemao: 'राज्य सरकार बहुजनविरोधी, 2027 निवडणुकीत भाजपचा होणार दारूण पराभव'; LOP आलेमाव यांचा घणाघात

Goa Politics: खरी कुजबुज; जनता दरबारात खोडा घालण्‍यासाठी रॅली?

Shirgao: बळीराजा संकटात! शिरगावात भातशेती पाण्याखाली; पावसाच्या तडाख्याने रोपे मातीमोल

SCROLL FOR NEXT