Margao Fish Market Dainik Gomantak
गोवा

Margao Fish Market: मडगावातील मासळी मार्केटची दुरवस्था! ग्राहक, विक्रेते त्रस्त; एसजीपीडीए, पालिकेच्या दुर्लक्षाबाबत नाराजी

Margao Fish Market Condition: एसजीपीडीएतर्फे मडगावमध्ये चालवली जाणारी सर्व मार्केट्स दुरवस्थेत असून, या मार्केट्सना कोणीही वाली नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Sameer Amunekar

सासष्टी: एसजीपीडीएतर्फे मडगावमध्ये चालवली जाणारी सर्व मार्केट्स दुरवस्थेत असून, या मार्केट्सना कोणीही वाली नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

घाऊक मासळी मार्केटमधील इमारतीचे उद्घाटन रखडले आहे. कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या या इमारतीच्या परिसरात सध्या कचरा व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. किरकोळ मासळी व भाजी मार्केटची अवस्था तर त्याहून अधिक भयानक आहे.

भाजी विक्रेते आपल्याला हव्या त्या प्रमाणे वागताना दिसतात. त्यांना दिलेल्या जागेपेक्षा प्रत्येकाने अधिक जागा व्यापली असून, ग्राहकांना फिरणेही कठीण झाले आहे. किरकोळ मासळी मार्केटबद्दल जितके बोलावे, तेवढे थोडेच; प्रवेशद्वारावर साचणाऱ्या साणपाण्यातून ग्राहकांना आत जावे लागते. दरवाजे गंजलेले आहेत. जिथे मासळी कापली जाते, तो परिसर अस्वच्छ आहे.

याबाबत बिबियान मिरांडा या मासळी विक्रेती महिलेने सांगितले की, या बाजारात कोणीही शिस्त पाळत नाही. स्वच्छतेसाठी पालिका किंवा एसजीपीडीएकडून एकही व्यक्ती येत नाही. फरशा मासळीच्या पाण्याने बुळबुळीत झाल्या असून, नुकतेच एक महिला घसरून पडली; तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली, असे त्यांनी सांगितले.

आणखी एका मासळी विक्रेती महिलेने सांगितले की, आम्ही येथे कशा परिस्थितीत बसतो, हे केवळ देवालाच माहीत. मंत्री, आमदार, एसजीपीडीएचे अध्यक्ष व अधिकाऱ्यांनी एकदा तरी येथे येऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी विनंती आहे. शिवाय मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. डिझेल महाग झाल्याने बोटींतून येणाऱ्या मासळीवर मर्यादा आल्या आहेत. आम्हालाही महाग मासळी विक्री करताना वाईट वाटते, असे तिने नमूद केले.

मार्केटमधील फरशा मोडलेल्या असल्याने त्यात पाणी साचते. काही मासळी विक्रेत्यांनी आपली जागा सोडून ग्राहकांसाठी राखीव जागेत बसण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोकळेपणाने फिरता येत नाही.

या मार्केटची अवस्था पाहून ग्राहकांची संख्या लक्षणीय घटल्याची तक्रार आणखी एका मासळी विक्रेती महिलेने केली.

कुणी वालीच नाही?

या मार्केटचे नूतनीकरण करण्याची भाषा राजकारणी करत असले तरी त्यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. विक्रेत्यांसाठी सोपो दर वाढविण्याचा एसजीपीडीएचा इरादा असला तरी त्यास विक्रेत्यांचा विरोध आहे. त्यामुळे एसजीपीडीएनेही या मासळी मार्केटकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अणुऊर्जेची कुंडले- संपादकीय

Goa Politics: आपल्याकडून विश्वासघात होणार नाही! काँग्रेस प्रवेशावेळी अमित पालेकरांनी नेत्यांना दिली ग्वाही

100 हून अधिक मुलींचे लैंगिक शोषण, गोमंतकीयाला स्विंडनमध्‍ये जन्मठेप; तब्बल 60 गुन्ह्यांची दिली कबुली

खरी कुजबुज: आता श्रद्धांजलीचेही राजकारण!

इंधन-एलपीजी पुरवठा सुरळीत, सरकारचा दावा; रांगा न लावण्याचे नागरिकांना आवाहन

SCROLL FOR NEXT