Cashew Plants Were Burnt In The Fire Dainik Gomantak
गोवा

Margao : मडगाव अग्निशमन दलाची आग विझवण्यासाठी धडपड

दिवसभरात आठ ठिकाणच्या मालमत्तेचे रक्षण

दैनिक गोमन्तक डिजिटल

Margao : मडगाव येथील अग्निशमन दलाचे पथक गुरुवारी पूर्ण दिवसासाठी अनेक ठिकाणी लागलेली आग विझविण्यात व्यस्त राहिले. मडगाव व सभोवतीच्या परिसरात एकंदरीत 8 ठिकाणी आग लागण्याचा प्रकार घडला. यात दलाच्या पथकाने 5 ते 6 लाख रुपयापर्यंत मालमत्ता आगीपासून वाचविण्यात यश मिळविले, अशी माहिती मडगाव अग्निशमन दल अधिकारी गिल डिसोजा यांनी दिली.

नवावाडो-सेर्नभाटी, कोलवा येथील रोमिओ कॉटेजजवळ सुक्या गवताला दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आग लागली. यात 10 हजार रुपयांचे नुकसान झाले, 5 लाख रुपयांची मालमत्ता वाचविण्यात आली. यावेळी मडगाव परिसरातील आग विझविण्याचा गाड्या व्यस्त असल्याने वेर्णा या ठिकाणाहून अग्निशमन दलाची गाडी पाचारण करण्यात आली.

कुडतरी येथील सेंट अँथोनी चॅपेलजवळ सुक्या गवताला आग लागली. मात्र यात काही नुकसान झाले नाही. कार्मोणा येथील पोस्ट ऑफिसजवळ सुक्या गवताला आग लागली, मात्र यात काही नुकसान झाले नाही. दवरली पंचायतीजवळ सायंकाळी 4. 45 वाजता सुक्या गवताला आग लागली. याही ठिकाणी कोणतीही मालमत्ता हानी झाली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT