Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Margao News : काँग्रेसला दोष देऊ नका, प्रकल्प रद्द करा : युरी आलेमाव

Margao News : गोव्यात कोळसा आणण्यास काँग्रेसच जबाबदार असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या सांकवाळे येथे केलेल्या भाषणावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेत्यांनी वीजमंत्र्यांना अशी सर्व कामे थांबवण्याचे भाजपला सांगण्याचे धाडस दाखविण्याचे उघड आव्हान दिले.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News :

मडगाव, वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी ज्या काँग्रेससोबत एकेकाळी सत्ता भोगली, त्या काँग्रेसला दोष देणे थांबवावे आणि भाजपला कोळसा वाहतूक बद, कॅसिनो आणि जुगार बंद करावा, ३ रेषीय प्रकल्प रद्द करा, कळसा भांडुरा प्रकल्पाच्या डीपीआरला दिलेली मान्यता मागे घ्या, बेरोजगारांना नोकऱ्या द्याव्या, असे सांगण्याचे धाडस करावे, असा टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला आहे.

गोव्यात कोळसा आणण्यास काँग्रेसच जबाबदार असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या सांकवाळे येथे केलेल्या भाषणावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेत्यांनी वीजमंत्र्यांना अशी सर्व कामे थांबवण्याचे भाजपला सांगण्याचे धाडस दाखविण्याचे उघड आव्हान दिले.

मला सुदिन ढवळीकर यांना आठवण करून द्यायची आहे, की आमचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांनी गोवा आणि गोमंतकीयांना हानिकारक ठरणाऱ्या कोळसा वाहतुकीसारख्या सर्व गोष्टी बंद करण्याचे भाजपला उघडपणे आव्हान दिले होते. पुन्हा पुन्हा काँग्रेसला दोष देऊ नका, असा इशाराही त्यांनी भाजप आणि इतरांना दिला होता. दुर्दैवाने भाजप आणि मगो केवळ दोषारोपाचे खेळ करत आहेत, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.

आता दिवस भरले!

सुदिन ढवळीकर आता पक्षांतराची वकिली करताना पाहून धक्का बसला आहे. आपली खुर्ची वाचवण्यासाठी त्यांना हे करणे भाग पडले आहे. कॉंग्रेसच्या जाहिरनाम्यातील पक्षांतरविरोधी कायद्याने भाजपला बिथरला आहे, म्हणून सुदिन यांना यावर बोलण्यास पुढे केले जात असून सुदिन ढवळीकर आणि इतरांचे मंत्रिमंडळातले दिवस आता भरले आहेत, असे युरी आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT