Cricket Training Camp  Dainik Gomantak
गोवा

Cricket Training Camp : मडगावात क्रिकेट प्रशिक्षण ; हातात चेंडू, पायाला पॅड मिशन मैदान

Cricket Training Camp : मडगाव क्रिकेट अकादमीने मुलांसाठी घोगळ हाऊसिंग बोर्डमधील फार्मसी मैदानावर २१ दिवसांचे क्रिकेट प्रशिक्षण शिबिर आयोजित केले असून सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रात मुलांना क्रिकेटचे धडे दिले जात असून जवळ जवळ ६० पेक्षा जास्त मुले व मुली सहभागी झाली आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

मंगेश बोरकर

Cricket Training Camp

सासष्टी, शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी पडलेली आहे. त्यामुळे मुले घरी आहेत. काहीही काम नसल्याने मुले बेजारही होतात व आपल्या पालकांना त्रासही देत असतात.

या सर्वांचा विचार करून तसेच मुलांना त्यांच्या कलागुणांतील कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी म्हणून मडगावमध्ये सध्या क्रीडा क्षेत्रात तसेच सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील काही संस्थांनी वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत.

मडगाव क्रिकेट अकादमीने मुलांसाठी घोगळ हाऊसिंग बोर्डमधील फार्मसी मैदानावर २१ दिवसांचे क्रिकेट प्रशिक्षण शिबिर आयोजित केले असून सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रात मुलांना क्रिकेटचे धडे दिले जात असून जवळ जवळ ६० पेक्षा जास्त मुले व मुली सहभागी झाली आहेत. या शिबिराचे हे ३२वे वर्ष असून गेली सलग ३१ वर्षे हे शिबिर आयोजित केले जाते व त्यास चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे प्रशिक्षक हेमंत आंगले यांनी सांगितले.

या व्यतिरिक्त मडगाव क्रिकेट क्लब, चौगुले कॉलेज व फातोर्डा साग मैदानावर सुद्धा अशा प्रकारची क्रिकेट प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

शिबिराची २६ वर्षे

फातोर्डा येथील जलतरण तलावात सुद्धा पोहण्यास शिकण्याचे वर्ग सुरू करण्यात आले असून अर्ज नेण्यासाठी पालकांनी तोबा गर्दी केली होती. काही पालकांना अर्ज मिळू न शकल्याने नाराज होऊन जावे लागले.

२सम्राट क्लब मडगावने १ ते १२ मे दरम्यान जुन्ता क्वॉटर्स व चौगुले महाविद्यालयात केजी ते सातवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यत २६वे वार्षिक उन्हाळी शिबिराचे आयोजन केले आहे.

३ खास तज्ञांकडून व्यक्तिमत्व, वेगवेगळी कौशल्ये, नृत्य, नाट्य, संगीत, फॅशन, चित्रकला, रंगकाम वगैरे क्षेत्रात प्रशिक्षित केले जाईल. या व्यतिरिक्त त्यास योग व जिमनेस्टिक्स व कुस्ती प्रशिक्षणांची जोड करण्यात आलेली आहे.

प्रज्ञा शोध

१ काही शाळांमध्ये चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञा शोध वर्गांचे आयोजन करण्यात आले असून त्यात परिसर अभ्यास, गणित सारखे विषय शिकवले जात आहेत. तसेच मराठीत चौथी शिकलेले व पाचवीत इंग्रजीत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा इंग्रजी व्याकरण, वाचन, उच्चार, शब्द व वाक्य रचना या बद्दल माहिती दिली जाईल व प्रशिक्षित केले जात आहे.

२मुलांना कुठल्या ना कुठल्या तरी त्यांच्या आवडीच्या विषयात गुंतवून ठेवण्यासाठी अशा प्रकारची शिबिरे अत्यंत आवश्यक असल्याचे मत काही पालकांनी व्यक्त केले. कोकणी भाषा मंडळात अभिनव क्रिएशन्सतर्फे "मज्जा" शिबिर चालू आहे. हे शिबिर ४ ते ८ वर्षापर्यंतच्या मुलां मुलींसाठी खुले असून या शिबिरात कला, नृत्य व इतर विषयांमध्ये मुलांना प्रशिक्षण दिले जात आहे.

परीक्षा संपल्‍या, शाळांना सुट्या लागल्‍या आहेत. मुलांसाठी हे मौजमजेचे दिवस. सुट्टीचा मनसोक्‍त आनंद लुटण्‍यासोबत

अंगी असलेल्‍या सुप्‍त कलागुणांना वाव देणारी उन्‍हाळी शिबिरे राज्‍यात सुरू झाली आहेत. नवे मित्र

बनविण्‍यापासून कौशल्‍ये,

नेतृत्वगुणांच्या विकासाला चालना देणाऱ्या चैत्रातील सृजनोत्‍सवाचा घेतलेला धांडोळा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: गोवा होणार देशातले पहिले 'Air Sea Tourism Hub'! मुंबईतील परिषदेत खवंटेंचे सूतोवाच; ‘ओपन स्काय पॉलिसी’ची केली मागणी

Goa Politics: खरी कुजबुज; शिक्षकांना हवी सेवानिवृत्ती वयात वाढ!

Goa Politics: 'गोव्यात हुकूमशाही अन् जंगल राज'! LOP आलेमाव यांचा घणाघात; ‘संविधान बचाव अभियाना'त डिचोलीत जागृती

Goa Beaches: गोवा किनारी क्षेत्राबाबत नवी अपडेट! व्यवस्थापन आराखडा डिसेंबरमध्ये; मच्छीमार वस्तीमध्ये साकारणार पर्यटन प्रकल्प

Ro Ro Ferryboat: 4 बोटींचे काम रो-रो फेरीबोट करणार, 14 जुलैपासून गोमंतकीयांच्या सेवेत; जाणून घ्या 'या' सेवेची वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT