sadanand shet tanavade And Amit Patkar
sadanand shet tanavade And Amit PatkarDainik Gomantak

Goa BJP Vs INC: 'भाजपने गोमन्तकीयांना धोका दिला, देवांचीही फसवणूक केली'; प्रदेशाध्यक्ष आमनेसामने

Goa BJP Vs INC: भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी केलेल्या टीकेला अमित पाटकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Goa BJP Vs INC

गोव्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोमात सुरु आहे. काँग्रेस, भाजप आणि आरजीकडून उमेदवारांच्या प्रचारासाठी विविध ठिकाणी प्रचारसभा घेण्यासह भेटीगाठी सुरु आहेत. यासह आरोपप्रत्यारोप देखील केले जात आहेत.

आरोपप्रत्यारोपांच्या फेरीत काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी केलेल्या टीकेला अमित पाटकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

"विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही लगेच लोकसभा प्रचार सुरु केला, तो अद्याप पूर्ण केलेला नाही. काँग्रेसचे उमेदवार मतदारसंघात पोहोचेपर्यंत निवडणुका समाप्त होतील," अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काँग्रेसवर टीका केली होती.

sadanand shet tanavade And Amit Patkar
Bolmax Pereira Case: छत्रपती शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बोलमॅक्स परेरांना मोठा दिलासा, गुन्हा रद्द

"काँग्रेसचे स्थान गोमन्तकीयांच्या ह्रदयात आहे. काँग्रेसने नेहमीच लोकांचा विश्वास संपादन केला आहे. भाजपने गोमन्तकीयांना धोका दिला आणि देवाचीही फसवणूक केली. त्यामुळे भाजप आणि सदानंद शेट तानावडे आता माफी मागण्यासाठी पुजास्थळांना भेट देत आहेत. पण, गोवा आणि गोमन्तकीय त्यांना कधीच माफ करणार नाहीत. काँग्रेस नेहमीच सत्यासोबत उभं राहते," असे उत्तर प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिले आहे.

पुढील आठवड्यात उमेदवारी अर्ज!

लोकसभा निवणुकीसाठी मतदानाची तारीख जवळ येत असल्याने आता प्रचारासह उमेदवारी अर्ज दाखल करण्याची देखील घाई केली जात आहे. भाजप आणि काँग्रेस पुढील आठवड्यात उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेस सोमवारी (दि.१५ एप्रिल) रमाकांत खलप आणि कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील. तर, त्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी (१६ एप्रिल) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी ११ वाजता पल्लवी धेंपे आणि दुपारी १२.१५ वाजता श्रीपाद नाईक अर्ज दाखल करतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com