Margao Court Dainik Gomantak
गोवा

Margao Court: पतीच्या कार लोनसाठी पत्नी हमीदार; चेक झाला बाऊन्स अन् महिलेला 15 लाख दंडासह झाली 2 महिन्यांची शिक्षा

व्‍हीपीके अर्बन को ऑपरेटिव्‍ह सोसायटीने या महिलेविरुद्ध मडगाव न्‍यायालयात खटला दाखल केला होता.

सुशांत कुंकळयेकर

धनादेश न वटल्‍याच्‍या आरोपावरुन मडगावच्‍या न्‍यायालयाने रावणफोंड-मडगाव येथील शर्मिला चोडणकर या महिलेला दोषी ठरवून दोन महिन्यांच्या कोठडीची शिक्षा ठोठावली आहे. पतीच्या कार लोनसाठी ही महिला हमीदार होती.

या प्रकरणी व्‍हीपीके अर्बन को ऑपरेटिव्‍ह सोसायटीने या महिलेविरुद्ध मडगाव न्‍यायालयात खटला दाखल केला होता.

न्‍यायालयात सादर केलेल्‍या कागदपत्रानुसार या सोसायटीने या आरोपी महिलेच्‍या पतीला 12 फेब्रूवारी 2014 रोजी कार घेण्‍यासाठी 12 लाखांचे कर्ज दिले होते. या कर्जासाठी संबंधित महिला हमीदार होती. कर्जदार कर्जाचा हप्‍ता भरण्‍यास अपयशी ठरल्‍याने सोसायटीने कर्जाची हमी दिलेल्‍या या महिलेला कर्जाची उर्वरित रकमेचा 15 लाख 13 हजार रुपयांचा धनादेश देण्‍यास सांगितले. मात्र हा धनादेश ‘अपुरा निधी’ असल्‍याच्‍या कारणास्‍तव वटला नाही.

धनादेश वटला नसल्‍याचे पाहून तक्रारदार सोसायटीने या महिलेविरुद्ध न्‍यायालयात खटला दाखल केला. न्‍यायालयात या खटल्‍याची सुनावणी झाली. त्‍यात आरोपीविरुद्ध असलेला आरोप न्‍यायालयात सिद्ध झाल्‍याचे मडगावच्‍या प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी मनीषा पारकर यांनी निवाड्यात म्‍हटलेले आहे.

आरोपी महिलेला न्‍यायालयाने 2 महिन्‍यांची कैदेची शिक्षा आणि 13 लाख 13 हजारांचा दंड भरण्‍याचा आदेश दिला. दंडाची रक्‍कम न भरल्‍यास आणखी एका महिन्‍याच्‍या कैदेची शिक्षा भोगावी असे निवाड्यात म्‍हटलेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT