Principal Gaurish Shankhwalkar ​ Dainik Gomantak
गोवा

Margo Municipal Council: ‘कायद्याच्या चौकटीत राहूनच चालवतो पालिकेचा कारभार’ : मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर

Margo Corporation : नगराध्यक्ष जे आरोप करीत आहेत ते सर्व बिनबुडाचे असून या आरोपांना उत्तर देण्यास मी बांधील नसल्याचेही मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Margo Municipal Council: मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी गुरुवारी (ता.७) पत्रकारांना सांगितले की, कायद्याच्या चौकटीत राहूनच नगरपालिकेचा कारभार चालवतो.

पालिकेचा कारभार कसा चालवावा हे आपल्याला दुसऱ्या कुणी सांगण्याची गरज नाही. मी मुरगाव पालिकेचाही मुख्याधिकारी म्हणून काम केलेले आहे.

नगराध्यक्ष जे आरोप करीत आहेत ते सर्व बिनबुडाचे असून या आरोपांना उत्तर देण्यास मी बांधील नसल्याचेही मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. माझ्याकडून बेकायदेशीर कारभार झाला असेल तर नगराध्यक्षांनी आपल्या लक्षात आणून द्यावे, असेही मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.

मी कुठे बसून काम करावे हे नगराध्यक्षांनी मला सांगू नये. मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनला टाळे ठोकण्याचा अधिकार नगराध्यक्षांना आहे की नाही हे आपल्याला माहीत नाही. ते केबिनमध्ये बसून काम करण्याची सक्ती माझ्यावर करू शकत नाहीत.

नगरपालिकेचा कारभार चालवताना जे-जे प्रशासकीय निर्णय घ्यावे लागतात ते मी स्वत: घेऊ शकतो, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.

ओला कचरा गळतीप्रकरणी आमचीही काही चूक असेल; पण अशा प्रकारची चूक यापुढे होणार नसल्याचेही आपण आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना सांगितले आहे. यंदाच्या फेस्त फेरीतील स्टॉलची वाटणी पारदर्शक पद्धतीने करण्यावर आपण भर दिला आहे व गतवर्षांपेक्षा जास्त महसूल नगरपालिकेला मिळणार याची खात्री आपल्याला आहे. प्रत्येक स्टॉलचे शुल्क ७,८५० रुपये ठेवण्यात आले आहे.
गौरीश शंखवाळकर, मुख्याधिकारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Roads: 'त्या' रस्त्याची चांगली 'पर्वरी'श झाली नाही; निवासी आणि प्रवासी संतप्त

Horoscope: प्रमोशन मिळणार, व्यापार वाढणार; कसा असणार 21 ऑगस्टचा दिवस; वाचा..

Goa Police: 3 वेगवेगळे आरोप, 2007 साली बडतर्फ; खंडपीठाच्या आदेशानंतर निलंबित हवालदार 18 वर्षांनंतर सेवेत

Davorlim: फ्लॅटमध्ये राहायचे 20 जण, चालायचा बेकायदेशीर मदरसा; रुमडामळ-दवर्लीत 17 अल्‍पवयीन मुलांची सुटका

Goa Opinion: गोव्यात मूलभूत सोयीसुविधा ज्या दिवशी निष्पक्षपणे मिळतील, तेव्हा ‘रामराज्य’ आले असे म्हणता येईल

SCROLL FOR NEXT