Margo Corporation Dainik Gomantak
गोवा

Margo Corporation : मडगावात पालिका परिसरातील पदपथावर भरतोय बाजार! पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

Margo Corporation : नगरसेवक, आमदारांनी लक्ष देण्याची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Margo Corporation :

सासष्टी, मडगाव शहरातील पदपथावरच बाजार भरत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पदपथावर वेगवेगळ्या प्रकारची दुकाने थाटण्यात आली आहेत. शिवाय पदपथाजवळच वाहने उभी केली जातात.

शिवाय पार्किंगसाठी ठेवलेल्या जागासुद्धा या बेकायदा व्यावसायिकांनी व्यापलेल्या आहेत. या प्रकाराकडे पालिकेचेही दुर्लक्ष झाले आहे. पालिकेने त्वरित कारवाई कारवाई अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे.

दुकाने थाटल्यामुळे पदपथावरून चालणे कठीण होत आहे. या प्रकारामुळे मडगावकर त्रस्त झाले आहेत. या प्रकाराबाबत आमदार, नगरसेवक, सरकारी अधिकारी अनभिज्ञ आहेत. त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. त्यांच्या दृष्टीला हा पदपथ दिसत नाही, त्यामुळेच अद्याप या बेकायदा व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली नाही.

नगरपालिका इमारत परिसरात स्थलांतरितांची गर्दीच असते. तिथे पार्किंग सुद्धा करायला लोकांना भिती वाटू लागली आहे. त्या भागातील रस्ते पिचकाऱ्यांनी रंगले आहेत. पालिकेने या प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे ज्येष्ठ नागरिकांचे मत आहे.

विनोद शिरोडकर म्हणाले, फुटपाथवरील बेकायदा व्यापारामुळे न्यू मार्केटमधील व्यापाऱ्यांवर उपासमारीचे दिवस आले आहेत. तक्रार करुन आम्ही थकलो आहोत. कारवाई होणे गरजेचे आहे.

अजब प्रकार!

न्यू मार्केट व्यापाऱ्यांची नूतन कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष गणेश नाईक म्हणाले, मार्केटमध्ये व नगरपालिका परिसरात जे बेकायदेशीर व्यापार चालू आहेत. त्याबद्दल आमदार दिगंबर कामत व नगरपालिकेला सांगण्यात आले आहे.

त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. पण या गोष्टीला आता जवळ जवळ दोन महिने झाले, तरी बेकायदेशीर कमी होण्याऐवजी वाढतच आहे. हा अजब प्रकार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर, गोव्यातील 'या' मार्गावर वाहनांना बंदी; जाणून घ्या पर्यायी व्यवस्था

Porvorim Roads: 'त्या' रस्त्याची चांगली 'पर्वरी'श झाली नाही; निवासी आणि प्रवासी संतप्त

Horoscope: प्रमोशन मिळणार, व्यापार वाढणार; कसा असणार 21 ऑगस्टचा दिवस; वाचा..

Goa Police: 3 वेगवेगळे आरोप, 2007 साली बडतर्फ; खंडपीठाच्या आदेशानंतर निलंबित हवालदार 18 वर्षांनंतर सेवेत

Davorlim: फ्लॅटमध्ये राहायचे 20 जण, चालायचा बेकायदेशीर मदरसा; रुमडामळ-दवर्लीत 17 अल्‍पवयीन मुलांची सुटका

SCROLL FOR NEXT