Garbage|Waste Canva
गोवा

Margao News: हा कचरा येतो कुठून? मडगावात नागरिक हैराण; पालिकेकडून सर्व काही सुरळीत असल्याचा दावा

Margao Waste Issue: कचरा नेमका येतो कुठून, कोण हा कचरा फेकतात, त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही का, असा प्रश्न मडगावातील नागरिक पालिकेला विचारत आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Garbage Problem

मडगाव: येथील कोंकण रेल्वे ते रावणफोंड, पॉवर हाऊस ते मारुती मंदिर, सोनसड्यावरून कुडतरी तसेच राय येथे जाण्याऱ्या रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचरा मोठ्या प्रमाणात फेकला जात आहे. त्यामुळे याठिकाणी कचऱ्याच्या राशी तयार झाल्या आहेत. हा कचरा कुठून येतो, कोण फेकतो, असे अनेक प्रश्न शहरवासीय विचारत आहेत, असा दावा शॅडो कौन्सिल संघटनेने केला आहे.

फातोर्डा मतदारसंघ हा मडगाव पालिका क्षेत्रात येत असला तरी फातोर्डा भागात कचऱ्याची समस्या तेवढी जाणवत नाही. मात्र मडगाव मतदारसंघात कचऱ्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. हा कचरा नेमका येतो कुठून, कोण हा कचरा फेकतात, त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही का, असा प्रश्न मडगावातील नागरिक पालिकेला विचारत आहेत. परंतु पालिका सफाई विभागाकडून सर्वकाही सुरळीत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, स्थिती मात्र वेगळीच आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिस खात्याला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, शेडो कौन्सिल फॉर मडगावचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी मडगावात सध्या ब्लॅक स्पॉटचा आकडा १०० वरती गेले आहेत, असा दावा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT