Goa Theft News Dainik Gomantak
गोवा

Margao Crime: मित्राला स्टेशनवर सोडले, झुडुपात बसलेल्या चौघांनी केला हल्ला; मोबाईल आणि रोख रक्कम पसार, संशयितांना अटक

Margao Railway Station Theft: सनी तिरकी हे तक्रारदार आहेत. स्टेशन रोड येथील ‘साई दरबार’ हॉटेलमध्‍ये ते काम करतात. आपल्या एका मित्राला अन्य तीन सहकाऱ्यांसह सोडून येताना हा हल्ला झाला.

Sameer Panditrao

मडगाव: आपल्या सहकारी मित्राला मडगावच्या कोकण रेल्वे स्टेशनवर सोडून परत येत असताना झुडपात लपून बसलेल्या काहीजणांनी चौघांवर अचानक हल्ला चढवून एकाचा मोबाईल व ४०० रुपये पळवून नेण्याची घटना काल शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास मडगावात घडली.

पोलिसांत तक्रार नोंद झाल्यानंतर पोलिसानी चौघांच्‍या मुसक्या आवळल्या. त्यांना अटक करून नंतर न्यायालयात उभे केले असता अधिक चौकशीसाठी पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

या प्रकरणी सनी तिरकी हे तक्रारदार आहेत. स्टेशन रोड येथील ‘साई दरबार’ हॉटेलमध्‍ये ते काम करतात. याच हॉटेलमधील आपल्या एका मित्राला अन्य तीन सहकाऱ्यांसह सोडून येताना हा हल्ला झाला. तक्रारदार व त्याचे मित्र हे ‘साई दरबार’ हॉटेलमध्‍येच काम करतात. संशयितांनी मोबाईल हिसकावून घेतल्यानंतर सीम कार्ड फेकून दिले होते.

तक्रारदाराने पोलिसांना संशयिताचे वर्णन केले होते. त्या आधारे पोलिसानी माग काडून सर्व संशयितांना अटक केली. अस्लम शेख (२२, हुबळी), दीपक सहानी (२३, हुबळी), आफताब खान (२२, राणीबिन्दूर) व आकाश बोटे (१८, पुणे) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिस निरीक्षक सूरज सामंत अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT