Goa Crime News | Sexual Assault on Minor at Bhoma Dainik Gomantak
गोवा

Teacher Molesting Student: शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; मडकईतील प्रकार

दोन महिने उलटूनही कारवाई न झाल्याने पोलिसांत तक्रार

दैनिक गोमन्तक

Alleged Molestation Minor Student By PE Teacher At Marcaim: मडकई परिसरातील एका विद्यालयातील शारीरिक शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला असल्याची तक्रार म्हार्दोळ पोलिस स्थानकात आज नोंदवण्यात आली.

विशेष म्हणजे दोन महिने उलटले तरी संबंधित शिक्षण संस्थेने कोणतीच कारवाई न केल्याने विद्यार्थिनीच्या पालकांना पोलिसांत धाव घ्यावी लागल्याचा आरोप रेव्होल्युशनरी गोवन्सच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

रेव्होल्युशनरी गोवन्सच्या कार्यकर्त्यांनी या मुलीच्या पालकांना धीर दिल्यानंतर या प्रकरणाला आता वाचा फुटली आहे.

चौदा वर्षीय विद्यार्थिनीचा संशयित शारीरिक शिक्षकाने विनयभंग केल्यानंतर विद्यार्थिनीने ही बाब सर्वप्रथम एका शिक्षिकेला सांगितली. त्यानंतर प्रकरण मुख्याध्यापकांपर्यंत गेले, पण पुढे काहीच झाले नाही.

ही विद्यार्थिनी आणि त्याच विद्यालयात शिकत असलेली तिची धाकटी बहीण मात्र भीतीमुळे या विद्यालयात पाय ठेवायला तयार नाही. गेल्या १ जुलैपासून या प्रकरणाचा पाठपुरावा संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांनी चालवला होता.

संबंधित शिक्षण संस्थेने याप्रकरणी कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने अखेर म्हार्दोळ पोलिसांत या प्रकरणाची नोंद करावी लागली असे या विद्यार्थिनीच्या नातेवाइकांनी सांगितले.

पोलिस तक्रार करतेवेळी पीडित मुलीचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. म्हार्दोळ पोलिस स्थानकात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे.

‘आरजी’च्या कार्यकर्त्यांकडून दिलासा

या अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्यानंतर भेदरलेल्या या मुलीला सावरण्यासाठी तिच्या पालकांना ‘आरजी’च्या कार्यकर्त्यांनी सहकार्य करून दिलासा दिला. ‘आरजी’ कार्यकर्त्यांच्या सहकाऱ्यामुळे हे प्रकरण अखेर पोलिसांत पोचले आहे.

आम्हाला कुणाला ‘टार्गेट’ करायचे नाही, पण जे सत्य आहे ते समोर यायला हवे आणि दोषीवर कारवाई व्हायला हवी, अशा मताचे आम्ही आहोत.

एखाद्या अल्पवयीन मुलीचा जर अशाप्रकारे एका शिक्षकाकडून विनयभंग होत असेल, तर ही बाब गंभीर असून असे प्रकार पुढे घडू नये, शिक्षण क्षेत्राला अशाप्रकारचा काळिमा लागू नये यासाठीच आम्ही या कुटुंबाला सहकार्य केले, असे आरजीचे प्रेमानंद गावडे, विश्‍वेश नाईक या कार्यकर्त्यांबरोबरच निवृत्त शिक्षिका दिवोदिता क्वाद्रोस यांनी स्पष्ट केले.

१२ दिवसांत तीन मुलींची तक्रार

म्हार्दोळ पोलिस स्थानकात गेल्या बारा दिवसांत एकूण तीन अल्पवयीन मुलींनी तक्रारी नोंदवल्या आहेत. दोन अल्पवयीन मुलींनी बलात्काराची, तर एका अल्पवयीन मुलीने विनयभंगाची तक्रार नोंदविली आहे.

माशेल येथील मुलीवरील बलात्कारप्रकरणी एका बसवाहकाला, तर भोम येथील बलात्कार प्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. आता हे विनयभंगाचे प्रकरण मडकईत घडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

SCROLL FOR NEXT