Goa Temperature Dainik Gomantak
गोवा

Goa Temperature: गोव्यात मार्च महिना नोंदवणार तापमानाचा नवा विक्रम?

पणजी येथे 3 मार्च रोजी 37.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद

Akshay Nirmale

Goa Temperature: मार्च महिन्याला सुरवात होऊन अद्याप पाच दिवसही होत नाहीत, तोपर्यंत गोव्यात मार्च महिन्यातील तापमानाचा आलेख वाढत चालला आहे. आत्तापर्यंतच्या मार्च महिन्यांमध्ये यंदाचा मार्च महिना हा सर्वाधिक उष्णतेचा असणार आहे, असे दिसते.

3 मार्च 2023 रोजी गोव्यात 37.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. आणि गेल्या अनेक वर्षात मार्च महिन्याच्या सुरवातीलाच असे जास्त तापमान पाहायला मिळत आहे.

गोव्याची राजधानी पणजी येथे 3 मार्च 2023 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास 37.8 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली. हे तापमानदेखील सर्वसामान्य तापमानापेक्षा 5.2 अंश सेल्सियनसने जास्त असल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे.

दरम्यान, 4 मार्चरोजी नॉर्थ गोव्यातील तापमान सर्वसामान्य तापमानापेक्षा 4 ते 6 अंश सेल्सियस जास्त असेल, असेही आयएमडीने म्हटले आहे.

गेल्या काही वर्षात पणजीतील मार्च महिन्यातील सर्वोच्च तापमान

तारीख तापमान (अंश सेल्यिससमध्ये)

  • 12 मार्च 1979 -------------39

  • 6 मार्च 2013 -------------- 38.7

  • 15 मार्च 2005 ----------- 38.7

  • 3 मार्च 1984 ------------- 38

  • 8 मार्च 2013 ------------- 38

  • 15 मार्च 1980 ------------ 37.9

  • 4 मार्च 2009 -------------- 37.9

  • 14 मार्च 2022 ------------ 37.8

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Birthday: टाइम्स स्क्वेअरवर पंतप्रधान मोदींचा गौरव! भारतीय समुदायाने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; 140 कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण

Ballaleshwar Ganpati: पालीचा बल्लाळेश्वर भक्ताच्या नावाने का ओळखला जातो? अढळ भक्तीची ही पौराणिक कथा प्रत्येक गणेशभक्ताने जाणून घ्यायलाच हवी

Goa vs Gujarat: अभिनव- सुयश अन् दर्शनचा धूमधडाका! गोव्यानं मारलं मैदान; 8 विकेट्सने गुजरातचा पराभव

Margao Stray Dogs Survey: मडगावातील भटक्या कुत्र्यांची, गुरांची संख्या कळणार; पालिकेकडून प्राणी मॅपिंग मोहिमेला सुरुवात, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

Surya Gochar 2026: बँक बॅलन्स वाढणार अन् व्यवसायात मोठे ऑर्डर मिळणार! शिस्त आणि बुद्धिमत्तेचा महासंयोग; सूर्यदेवाची 'या' राशींवर होणार विशेष कृपा

SCROLL FOR NEXT