Marcel Crime News Dainik Gomantak
गोवा

Marcel Crime News: 'त्या' हेड कॉन्स्टेबलला दादागिरी भोवली! माशेल मारहाणप्रकरणी निलंबन...

समीर फडते हा सध्या फरार आहे

Kavya Powar

Marcel Crime News: माशेलमध्ये फास्ट फूड मालकाला मारहाण करणाऱ्या फोंडा पोलीस स्थानकाच्या हेड कॉन्स्टेबल समीर फडतेचे निलंबन करण्यात आले आहे. सोबतच एएनसी कॉन्स्टेबल आकाश नावेलकरला अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, फास्ट फूड मालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर कॉन्स्टेबल समीर फडते आणि त्याच्या सहकाऱ्यांवर म्हार्दोळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्वांवर कारवाई करण्यात आली असून फडतेचे निलंबन करण्यात आले.

सोबतच एएनसी कॉन्स्टेबल आकाश नावेलकरला अटक करण्यात आल्याचे कळते. या प्रकरणातील महत्वाची बाब म्हणजे समीर फडते हा सध्या फरार आहे. त्याचा शोध सुरू असून त्याचे इतर सहकारी मितेश गाड, मोहित गाड आणि सुप्रेश या अन्य तिघांचाही शोध सुरू आहे.

असे आहे संपूर्ण प्रकरण..

माशेलमधील फास्ट फूड मालक विराज माशेलकर यांना निलंबित पोलीस कॉन्स्टेबल समीर फडते आणि त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी मारहाण केली. हेड कॉन्स्टेबल फडते आणि त्यांचे मित्र एका ठिकाणी गेले असता, तिथे त्यांचा कोणाशी वाद झाला. याबाबत विराज यांनी आपल्या दुकानात आल्यानंतर एकाला या घटनेची माहिती सांगितली.

हे फडके यांना समजल्यानंतर त्यांनी विराज यांच्या दुकानावर हल्ला चढवला. याबाबत दोघांमध्येही बाचावाची झाली. याचे रूपांतर नंतर मारामारीमध्ये झाले. फडते यांनी विराज माशेलकर यांना मारहाण करायला सुरुवात केली.

विराज यांनी याबाबत प्रतिकार केला असता कॉन्स्टेबल फडते यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या इतर मित्रांनीही विराजला मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Modi Express For Ganeshotsav: 'कोकणात' जाऊचो आनंद काय वेगळोच... गणेशोत्सवासाठी 'मोदी एक्सप्रेस' धावली, नितेश राणेंचा रेल्वेत फेरफटका Watch Video

12 कोटी कॅश, 6 कोटींचे दागिने, १ कोटी परकीय चलन आणि अलिशान कार; काँग्रेस आमदाराला अटक, गोव्यात केली होती छापेमारी

फोटो द्या आणि कलात्मक चित्र मिळवा! गोव्यात सुरू झालाय 'मारियो मिरांडा'च्या शैलीत स्वतःचं चित्र बनवून देणारा उपक्रम

Goa News Live Update: गणेशोत्सवाच्या प्रवासासाठी पुरेशी व्यवस्था करण्यासाठी केटीसी सज्ज

Sindhudurg Bus Cancelled: गणपतीच्या खरेदीला जायचंय पण बसच नाही! सिंधुदुर्गात एसटीच्या 230 फेऱ्या रद्द, मुंबई-ठाण्याला पाठवल्या बस

SCROLL FOR NEXT