Goa Crime News: पोलीस हेडकॉन्स्टेबलची दादागिरी! माशेलमधील फास्टफूड मालकाला बेदम मारहाण...

किरकोळ कारणावरून हाणामारी; सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime News: माशेल येथे एका फास्ट फूड चालक मालकाला पोलीस कॉन्स्टेबलने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरऱ्यमध्ये कैद झाली आहे. याबाबत संबंधित हेडकॉन्स्टेबलवर म्हार्दोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Goa Crime News
Sirsaim By-Poll Election Result: शिरसई पोटनिवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधून तेजा कांदोळकर विजयाच्या मानकरी!

उपलब्ध माहितीनुसार, माशेलमधील फास्ट फूड मालक विराज माशेलकर यांना निलंबित पोलीस कॉन्स्टेबल समीर फडते आणि त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी मारहाण केली. हेड कॉन्स्टेबल फडते आणि त्यांचे मित्र एका ठिकाणी गेले असता, तिथे त्यांचा कोणाशी वाद झाला. याबाबत विराज यांनी आपल्या दुकानात आल्यानंतर एकाला या घटनेची माहिती सांगितली.

हे फडके यांना समजल्यानंतर त्यांनी विराज यांच्या दुकानावर हल्ला चढवला. याबाबत दोघांमध्येही बाचावाची झाली. याचे रूपांतर नंतर मारामारीमध्ये झाले. फडते यांनी विराज माशेलकर यांना मारहाण करायला सुरुवात केली.

विराज यांनी याबाबत प्रतिकार केला असता कॉन्स्टेबल फडते यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या इतर मित्रांनीही विराजला मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

तब्बल सहाजणांनी एकसाथ त्यांच्यावर हल्ला चढवल्याने विराज यांना किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, संबंधित हेड कॉन्स्टेबलविरोधात याआधीही मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याप्रकरणी त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्यालाही मारहाण केल्यामुळे त्यांना त्यावेळी निलंबित करण्यात आले होते. आता पुन्हा असाच प्रकार घडला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com