Subhash Velingkar Dainik Gomantak
गोवा

Khandola: मराठी राजभाषा हेच अंतिम ध्येय! वेलिंगकरांची स्पष्टोक्ती; माशेलात मराठीप्रेमींचा निर्धार मेळावा

Subhash Velingkar: वेलिंगकर पुढे म्हणाले, गोव्यात ८० टक्के लोकसंख्या मराठीप्रेमींनी व्यापलेली आहे. येथे पूर्वीपासून मराठी संस्कृती रुजलेली आहे.

Sameer Panditrao

खांडोळा: मराठीची ताकद आम्हांला आता राजकीयदृष्ट्या दाखवायची आहे आणि त्याचसाठी या मेळाव्याची सुरुवात केली आहे. त्यासाठी या मेळाव्यातून जागृतीचे काम सुरू असून मराठीची ताकद मतांमध्ये परिवर्तित करण्यासाठी आम्ही एकजुटीने झटले पाहिजे.

जो मराठी झटतो, त्यालाच मते द्यायची आहे. मग तो कुठल्याही पक्षाचा असला तरी चालतो, ही विचार धारा पक्की केली पाहिजे. कारण मराठी राजभाषा हेच अंतिम ध्येय ठेवले पाहिजे, असे उद्‍गार मराठी राजभाषा निर्धार समिती गोवाचे निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी माशेल येथे काढले.

ते माशेल येथील नोनू व्हिलेजच्या संगिता सभागृहामध्ये मराठी राज्य भाषा निर्धार सभेत प्रमुख वक्ते म्हणून बोलता होते. व्यासपीठावर गो. रा. ढवळीकर, शाणू सावंत, हनुमंत मांजरेकर, सुरेश डिचोलकर, अशोक नाईक व युवा प्रतिनिधी श्रुतिका नाईक इत्यादी मंडळी उपस्थित होती.

वेलिंगकर पुढे म्हणाले, गोव्यात ८० टक्के लोकसंख्या मराठीप्रेमींनी व्यापलेली आहे. येथे पूर्वीपासून मराठी संस्कृती रुजलेली आहे. त्यामुळे मराठी ही राजभाषा व्हावी, यासाठी आमचा निर्धार आहे. मराठी राज्यभाषेसाठी आम्ही आरपार लढाई करू. मराठी राजभाषा झालीच पाहिजे आणि ती होणारच, यासाठीची मराठीप्रेंमीचे प्रयत्न आहेत.

मान्यवरांचे कविता फडते व मीरा पटेल यांनी स्वागत केले. प्रास्ताविक हनुमंत मांजरेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रविण नाईक व प्रणय नाईक यांनी आणि आभार सुरेश डिचोलकर यांनी मानले.

मराठीवर अन्याय!

गो. रा. ढवळीकर म्हणाले, गोव्याची राजभाषा ठरविताना त्यावेळच्या राजकर्त्यांनी मोठी चूक केली आणि मराठीवर अन्याय केला. बोली भाषा असलेली कोकणी, ९५ टक्के लोक म्हणून राजभाषा म्हणून आमच्यावर लादली. वास्तविक कित्येक शतकांपासून गोव्याचे सांस्कृतिक कार्यक्रम हे मराठीतून होतात, त्याला कित्येक पुरावे उपलब्ध आहेत. संस्कृती रक्षणासाठी आता एकत्र येऊन राज्यभाषेसाठी शेवटचा लढा देणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

काणकोणात २९ रोजी मेळावा

मराठी भाषा निर्धार समिती, काणकोणतर्फे २९ जूनला संध्याकाळी ३.३० वाजता प्रखंड मेळावा आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. हा मेळावा भगतवाडा- चार रस्ता येथील श्री निराकार देवालयाच्या सभागृहात हा मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्याला गो. रा. ढवळीकर व सुभाष वेलिंगकर संबोधित करणार आहेत. आज बैठकीला शिवानंद देसाई यांनी मार्गदर्शन केले.या वेळी तालुका समितीचे अध्यक्ष सम्राट भगत, गोवा मराठी अकादमी काणकोण शाखा अध्यक्ष संदीप नाईक गावकर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kundaim Fire: कुंडई वीजतारांमुळे वाढला धोका! आगीच्या घटनांमध्ये वाढ; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

खोटी कागदपत्रं वापरून घेतला पासपोर्ट, गोव्यात करायची सलूनमध्ये काम; फिलिपिन्स महिलेसह स्थानिकाच्या आवळल्या मुसक्या

"वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास करणार"! रितेश नाईकांनी दिली ग्वाही; पांचमे- खांडेपार तळ्याच्या संवर्धन कामाचे केले उद्‍घाटन

Farmagudhi to Bhoma Road: फर्मागुढी-भोम रस्ता काम होणार सुरु! मंत्री कामतांची ग्वाही; बांदोडा ‘अंडरपास’चे उद्‌घाटन

Chimbel Unity Mall: 'चिंबल' ग्रामस्थांचे मोठे यश! युनिटी मॉल बांधकाम परवान्याला दिले आव्हान; सरकारी पक्षाचा विरोध फेटाळला

SCROLL FOR NEXT