Subhash Velingkar Dainik Gomantak
गोवा

Marathi: मराठीप्रेमींनी जागृत होण्याची वेळ आली आहे! राजभाषा समितीचा 'निर्धार'; जनजागरण अभियानाचा मांद्रेतून श्रीगणेशा

Subhash Velingkar: अभियानाचा श्रीगणेशा शनिवार २६ एप्रिल रोजी मांद्रे प्रखंडातून करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी दिली.

Sameer Panditrao

पणजी: गेल्या चार दशकांमध्ये मराठी भाषेवर गोव्यात झालेला अन्याय आणि दुर्लक्षितपणा लक्षात घेता, आता मराठीप्रेमींनी जागृत होण्याची वेळ आली आहे. याच उद्देशाने ‘मराठी राजभाषा निर्धार समिती’च्या सुकाणू बैठकीत ‘जनजागरण अभियान’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा अभियानाचा श्रीगणेशा शनिवार २६ एप्रिल रोजी मांद्रे प्रखंडातून करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी दिली.

या अभियानाची व्याप्ती वाढवण्यासाठी समितीने पारंपरिक १२ तालुक्यांऐवजी भौगोलिकदृष्ट्या अधिक कार्यक्षम अशा १८ प्रखंडांची रचना केली आहे. एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांत या सर्व प्रखंडांमध्ये मराठीप्रेमींचे ‘प्रखंड मेळावे’ आयोजित केले जातील. या मेळाव्यांतून सर्वसमावेशक प्रखंड समित्यांची स्थापना केली जाणार असून, त्या समित्यांमार्फत आंदोलन अधिक बळकट केले जाईल.

प्रत्येक प्रखंड मेळाव्यात मराठी भाषेसाठीच्या लढ्याची दिशा स्पष्ट करणारी कृती योजना सादर केली जाईल. ही कृती योजना प्रथम टप्प्यात प्रखंडस्तरावर अमलात आणली जाईल.

सुकाणू बैठकीत ‘मराठी राजभाषा निर्धार समिती’ची भूमिका, धोरण व आगामी वाटचाल यावर सखोल चर्चा करण्यात आली. प्रारंभी प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी बैठक सुरू करत मराठीसंबंधित अन्याय आणि त्याविरोधातील आवश्यक उपाययोजना मांडल्या. त्यानंतर ज्येष्ठ मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर यांच्या उपस्थितीत विविध सदस्यांनी आपले विचार मांडले.

या बैठकीत प्रदीप घाडी आमोणकर, प्रा. नारायण महाले, डॉ. अनुजा जोशी, विजय नाईक, गोविंद देव, गो. रा. ढवळीकर, प्राचार्य गजानन मांद्रेकर, अनुराधा मोघे, गुरुदास सावळ, नितीन फळदेसाई आदी उपस्थित होते.

मराठीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित

या अभियानामार्फत गोव्यातील जनमानसात मराठी भाषेसंबंधी जागृती निर्माण करणे, तिच्या हक्कांचे रक्षण करणे आणि मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी दबाव निर्माण करणे, हा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे आगामी काळात मराठीप्रेमींनी एकत्र येऊन या चळवळीस अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूप देणे आवश्यक ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT