gudi padwa festival  Dainik Gomantak
गोवा

काणकोणात नववर्षाचे स्वागत

पहाटे मारुती मंदिर चावडी येथून वाहन फेरीला सुरुवात झाली.

दैनिक गोमन्तक

आगोंद: चावडी येथील गायतोंडे मैदानावर स्वागत यात्रा, गुढी उभारून, सूर्याची ओवाळणी, पंचांग वाचन आणि प्रसाद वितरण करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यात आले. याशिवाय पैंगीण व गावडोंगरी येथेही कार्यक्रम झाले.

पहाटे मारुती मंदिर चावडी येथून वाहन फेरीला सुरुवात झाली. नगरपालिका भागातून फिरून वाहन फेरीची समाप्ती गायतोंडे मैदानावर झाल्यानंतर जाहीर कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी सभापती रमेश तवडकर, समाजिक कार्यकर्ते रंगनाथ कोमरपंत, गोपाळकृष्ण कोमरपंत, सतीश वेर्णेकर, दिलखुश शेट, राजू राणे, पंकज नाईक गावकर आदींच्या हस्ते पटांगणावर गुढी उभारण्यात आली.

त्यानंतर सुवासिनींकडून सूर्य ओवाळणी झाली. चिन्मय आमशेकर व सर्वेश हेगडे यांनी पंचांग वाचन केले. प्रतीश प्रभुदेसाई यांनी आभार मानले. प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची समाप्ती झाली. दरम्यान, पैंगीण येथे नववर्षदिनानिमित्त श्रद्धानंद विद्यालयाजवळील पटांगणात सामूहिक गुढीपूजन, सुवासिनींकडून सूर्याला ओवाळणी, पंचांग वाचन व श्रवण, प्रसाद वितरण आणि एकमेकांना नववर्षदिनाच्या शुभेच्छा देऊन गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. नववर्ष स्वागत समितीचे निमंत्रक काशिनाथ वझे व उमेश प्रभुदेसाई बोरूसकर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला.

गावडोंगरी येथेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील सरकारी माध्यमिक विद्यालयापासून 14 वयोगटातील 100 मुलांची ढोल ताशांच्या गजरात मल्लिकार्जुन देवालय गावडोंगरी येथपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पंचांग वाचन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT