साखळी: देव, देश व धर्माचे रक्षण करणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी अनेक योगी पुरुषांनी जन्म घेतला. शिक्षण व उत्सवाच्या माध्यमातून नव्या पिढीवर हिंदू धर्माचे संस्कार करणे गरजेचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.
गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत समितीने आयोजित केलेल्या नववर्ष स्वागत उत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी भारत स्वाभिमान ट्रस्टचे अध्यक्ष तथा पतंजलीचे योग प्रशिक्षक डॉ. कमलेश बांदेकर, राधाकृष्ण देवस्थान समितीचे अध्यक्ष राजदत्त मापारी, खजिनदार नरेश दातये, नगरसेवक आनंद काणेकर, राजेंद्र आमेसकर, नववर्ष स्वागत समितीचे मनोज सावईकर, सचिन कर्पे उपस्थित होते.
समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही साखळी येथील जुन्या बसस्थानकावर जमून लोकांनी प्रार्थना केली. नंतर गुढी उभारून पूजन करण्यात आले. यावेळी काढण्यात आलेल्या प्रभातफेरीमध्ये दामोदर नाईक, मनोज सावईकर, अॅड. स्वाती केरकर, आशिष ठाकूर देसाई, पूजा मराठे, सचिन कर्पे, राधिका सातोस्कर, सुविधा पेडणेकर, सुशांत पाटील, संतोष भगत, शिवानंद बाक्रे, उपेंद्र कर्पे, चंद्रशेखर देसाई, बाहुबली शेंदुरे, प्रभानंद पाडलोस्कर, आत्माराम देसाई, समीर प्रभू, लवू गोवेकर, रघुवीर मडकईकर, अॅड. करुणा बाक्रे, उल्हास केरकर, प्रकाश राजाध्यक्ष, धिरेश पेडणेकर, नरेश दातये, राजेंद्र आमेसकर, शशांक नाईक, शांताराम काणेकर, दत्तगुरू जोशी, गजानन शेट्ये, प्रेमानंद शेट वेलिंगकर, मंगेश दातये, पार्थ सातोस्कर, गजानन नार्वेकर, आनंद काणेकर,अनिल काणेकर, विनायक शेट्ये, आकांक्षा सुतार, शुभदा सावईकर, शशिकांत नाईक, विष्णू मराठे, भानुदास परब, माधव बोडके आदींनी भाग घेतला.
यावेळी प्रेमानंद शेट वेलिंगकर यांनी भजन सादर केले. प्रभात फेरी राधाकृष्ण मंदिरात पोचल्यानंतर नववर्ष कार्यक्रम सादर करण्यात आला. शुभदा सावईकर यांनी सूत्रसंचालन केले तर राधिका सातोस्कर यांनी आभार मानले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.