Goa Marathi language Dainik Gomantak
गोवा

Goa Marathi language: गोव्यात मराठी भाषेच्या हक्कासाठी 'जनजागरण अभियान', मांद्रेतून सुरू होणार पुढील टप्प्या

Marathi language movement in Goa: मराठी राजभाषा निर्धार समितीच्या नेतृत्वाखाली जनजागरण अभियान सुरु करण्यात येत असून, याचा प्रारंभ २६ एप्रिल रोजी मांद्रे प्रखंडामधून होणार आहे.

Sameer Amunekar

पणजी: गोव्यातील मराठी भाषेच्या हक्कासाठी लढा उभारण्याच्या उद्देशानं 'मराठी राजभाषा निर्धार समिती'च्या नेतृत्वाखाली 'जनजागरण अभियान' सुरु करण्यात येत असून, या अभियानाचा पुढील टप्पा २६ एप्रिल रोजी मांद्रे प्रखंडामधून होणार असल्याची माहिती राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी दिलीय.

'मराठी राजभाषा निर्धार समिती'च्या सुकाणू बैठकीत 'जनजागरण अभियान' हाती घेण्याचे निश्चित करण्यात आलं होतं. या अभियानाचा पुढील टप्पा शनिवार, २६ एप्रिल रोजी मांद्रे प्रखंडातून होणार आहे, अशी माहिती समितीचे राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी दिली.

हे अभियान २६ एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान विविध भागांमध्ये राबविण्यात येणार असून, जनतेमध्ये मराठी भाषेविषयी जागरूकता निर्माण करणे, मराठी भाषेला न्याय मिळवून देणं हे यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे.

जनजागरण अभियानाचा पहिला प्रखंड मेळावा शनिवार, २६ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता, श्रीभगवती मंदिराजवळील जिल्हा पंचायत सभागृह, मांद्रे येथे होणार आहे. तर दुसरा मेळावा सत्तरीमध्ये रविवार, २७ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वाजता वाळपई येथील गोविंद काणेकर सभागृहात पार पडणार आहे.

तसेच, शिरोडा प्रखंड मेळावा मंगळवार, २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५.०० वाजता, श्री रवळनाथ सभागृह, शिरोडा येथे तिसरा मेळावा होणार आहे.

एप्रिल, मे आणि जून अशा तीन महिन्यांच्या कालावधीत आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत राज्यात विभागणी करण्यात आलेल्या एकूण १८ प्रखंडांमध्ये प्रखंड मेळावे आयोजित करण्यात येतील.

या प्रत्येक प्रखंड मेळाव्यात स्थानिक प्रखंड समित्या स्थापन करण्यात येणार असून, त्या समित्या पुढील जनजागरण, संवाद आणि आंदोलनात्मक उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी करतील. हे टप्प्याटप्प्याने होणारे मेळावे संपूर्ण गोव्यात मराठी भाषिक जनतेला एकत्र आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT