School Closed X
गोवा

School Closure In Goa: चिंताजनक! 5 वर्षांत 61 मराठी, कोकणी शाळा पडल्या बंद; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Konkani School Goa Closure: मागील पाच वर्षांत राज्यातील मराठी आणि कोकणी भाषेतील ६१ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्या आहेत.

Sameer Panditrao

पणजी: मागील पाच वर्षांत राज्यातील मराठी आणि कोकणी भाषेतील ६१ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्या असून जर या शाळांना आवश्‍यक असणारी पटसंख्या मिळाली तर त्या पुन्हा सुरू करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी विचारलेल्या अतारांकित प्रश्‍नाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.

पालकांनी आपल्या मुलांना सरकारी प्राथमिक शाळेत पाठवावे यासाठी सरकार कोणते प्रयत्न करत आहे, असा प्रश्‍नही डिकॉस्टा यांनी विचारला असता उत्तरात म्हटले आहे की, सरकारी शाळांमध्ये अतिशय उत्तम गुणवत्ता असलेले शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे सरकारी शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता चांगली आहे.

Konkani School Goa Closure:

सरकारी शाळांच्या साधनसुविधांमध्ये देखील चांगली सुधारणा करण्यात आली आहे. त्यासोबत मुलांना माध्यान्ह आहार (पीएम-पोशण), मोफत पाठ्यपुस्तके, वह्या, शालेय गणवेश तसेच रेनकोट आदी मोफत पुरविण्यात येतात. योग शिक्षण, मूल्य शिक्षण, गोवा शिक्षण विकास मंडळाद्वारे नागरी सहभाग वाढविणे आदींवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT