Goa Marathi News Dainik Gomantak
गोवा

Goa News: भोम येथील स्थानिकांनी महामार्ग रुंदीकरणाबद्दल व्यक्त केली चिंता; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Today's Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील राजकारण,मनोरंजन,क्रीडा आणि इतर महत्वाच्या घडामोडी

गोमंतक ऑनलाईन टीम

"जसं कर्म करतं तसं फळ मिळतं"

गोविंद गावडेंना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर मंत्री सुदिन ढवळीकरांची पहिली प्रतिक्रिया.

सरकारच्या बॉडीकॅम कायद्यामुळे, नो-एंट्री हा ड्रायव्हर्ससाठी एक शॉर्टकट बनलाय; Watch Video

भोम येथील स्थानिकांनी महामार्ग रुंदीकरणाबद्दल चिंता व्यक्त केल्या

उत्पल पर्रीकर यांच्याशी झालेल्या बैठकीत भोम येथील स्थानिकांनी महामार्ग रुंदीकरणाबद्दलच्या त्यांच्या चिंता व्यक्त केल्या

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माशेल शाळेला अचानक भेट देऊन घेतला इडली नाष्ट्याचा आस्वाद; Watch Video

विश्वास सतरकरांचे प्रियोळच्या सर्व माजी भाजप मंडळ अध्यक्षांकडून अभिनंदन!

प्रदेश भाजपचे नवनिर्वाचीत उपाध्यक्षपद प्रियोळचे माजी आमदार एड.विश्वास सतरकरांचे प्रियोळ मतदारसंघातील सर्व माजी भाजप मंडळ अध्यक्षांकडून अभिष्टचिंतन. काशिनाथ गावडे,सतीश मडकईकर,दिलीप नाईक,उत्तम फडते,शिवाजी गावडे, गजानन‌ प्रभूदेसाई यांनी सतरकरांच्या घरी भेट देत केले अभिनंदन.

स्वयं अपघातात गंभीर जखमी झालेल्या स्कुटर चालकाचा मृत्यू

केरये- खांडेपार येथे सोमवारी रात्री स्वयं अपघातातगंभीर जखमी झालेल्या नुशी नाईक (३६, तरवळे- शिरोडा) या स्कुटर चालकाचा उपचार सुरु असताना गोमेकोत मृत्यू.

वादळी वाऱ्यामुळे झाड घरावर तसेच कार, दुचाकीवर पडून मालमत्तेचे लाखोंचे नुकसान

नारायण नगर होंडा येथे वादळी वाऱ्यामुळे आज पहाटे महेश तांबट यांच्या घरा शेजारी असलेले आंब्याचे झाड घरावर तसेच कार, दुचाकीवर पडून मालमत्तेचे लाखोंचे नुकसान. सुदैवाने जीवितहानी टळली. वाळपई अग्निशमन दलातर्फे मदतकार्य.

स्मार्ट सिटीमध्ये पुन्हा गांजाचे रोप

पणजी स्मार्ट सिटीमध्ये जुन्या उत्पादन शुल्क मुख्यालयाजवळ आणखी एक गांजाचा रोप सापडले. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

केरये- खांडेपार येथे सोमवारी रात्री स्वयं अपघातात स्कुटर चालक गंभीर जखमी

केरये- खांडेपार येथे सोमवारी रात्री स्वयं अपघातात स्कुटर चालक गंभीर जखमी. जखमीवर गोमेकोत उपचार सुरु. फोंडा पोलिसांनी केला पंचनामा

मध्यपूर्वेतील तणावग्रस्त परिस्थितीमुळे एअर इंडियाने उड्डाणे स्थगित केली

मध्यपूर्वेतील तणावग्रस्त परिस्थितीमुळे एअर इंडियाने तात्काळ प्रभावाने त्या भागातील तसेच उत्तर अमेरिका व युरोपच्या पूर्व किनाऱ्यावरील उड्डाणे स्थगित केली आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेला निर्णय असून स्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे असे एअर इंडियाने एक्सवर म्हटले आहे

सोनारबाग- उसगाव येथे झाड वीज वाहिन्यावर कोसळल्याने 3वीज खांब जमीनदोस्त

सोनारबाग- उसगाव येथे झाड वीज वाहिन्यावर कोसळल्याने ३ वीज खांब जमीनदोस्त. काहीवेळ वाहतूक ठप्प झाल्याने विध्यार्थी व कामगार वर्ग पडले अडकून. फोंडा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यानी त्वरित हटवले रस्त्यावरील झाड.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

Bank Loan: 181 कोटींची कर्जे थकित, बँकांकडून पाच वर्षांत घेतली 43,103 कोटींची कर्जे

E Challan Cyber Fraud: बनावट 'ई-चलन', सायबर भामट्यांचा नवा सापळा! वाहतूक विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन

Fishing Boat Missing: भरकटलेल्या मच्छिमारांचा अखेर 12 तासांनंतर शोध, चारही जण सुखरूप तळपण जेटीवर

SCROLL FOR NEXT