CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa News: "आमदार आणि कार्यकर्त्यांनो, नकारात्मक वक्तव्य करणं टाळा''; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Goa Marathi News 06 January 2025: गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन, पर्यटन आणि इतर महत्वाच्या घडामोडी

Akshata Chhatre

"आमदार आणि कार्यकर्त्यांनो, नकारात्मक वक्तव्य करणं टाळा!!"

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भारतीय जनता पक्षाच्या आमदार आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या जाहीर वक्तव्यांमध्ये सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी नकारात्मक वक्तव्य करणे टाळावे, असा सल्ला देत पक्षांतर्गत समस्या चर्चा करून सोडवल्या पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

आमदार अपात्रता प्रकरणी सभापती रमेश तवडकर यांच्याविरोधात अवमान याचिका

आमदार अपात्रतेबाबत कॉंग्रेसने दाखल केलेल्या याचिकेवर वेळेत निर्णय न दिल्याबाबत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्याकडून सभापती रमेश तवडकर यांच्याविरोधात हायकोर्टात अवमान याचिका दाखल

भाजपचे जिल्हा अध्यक्ष ११ जानेवारीला जाहीर होणार

भाजपचे मंडळ अध्यक्ष ठरले. फक्त ४ मतदारसंघांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी सदस्य नोंदणी झाल्याने तिथे मंडळ अध्यक्ष ठरलेले नाहीत. यात मडकईचाही समावेश. १० जानेवारीला दोन्ही जिल्हाध्यक्ष पदांसाठी होणार निवडणूक. ११ जानेवारीला नावे होणार जाहीर. त्यानंतर ठरणार प्रदेशाध्यक्ष.प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंची माहिती.

आता विश्वजीत राणेंकडूनही तानावडेंच्या कार्याची स्तुती

विद्यमान प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंच्या कामगिरीचे मंत्री विश्वजीत राणेंकडून जाहीर कौतूक. माविन,बाबुश आणि आता विश्वजीतच्या वक्तव्याने तानावडेंच पुन्हा प्रदेशाध्यक्ष चर्चा प्रबळ‌.

श्री रूद्रेश्वर रथोत्सव; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभिषेक

हरवळे, साखळी येथील श्री रूद्रेश्वर देवाच्या रथोत्सवानिमित्त आज मंदिरात पूजा व अभिषेक करण्यात आला. त्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपस्थित राहून पूजा व अभिषेक केला आणि या रथोत्सवाला शुभेच्छा दिल्या.

भारतात पहिल्या HMPV प्रकरणाची नोंद

भारतात ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) चे पहिले प्रकरण नोंदवले गेले; बंगळुरूमध्ये ८ महिन्यांच्या बाळाची चाचणी पॉझिटिव्ह.

फ्लॅट चोरी संशयीत अनिस अब्दुल शेखला अटक

कुर्टी फोंडा येथील काही महिन्यापुर्वी फ्लॅट मध्ये चोरी केल्याप्रकरणी संशयीत अनिस अब्दुल शेख (३६, मुर्डेश्वर - कर्नाटक) याला उत्तरप्रदेश मधून अटक करण्यात फोंडा पोलिसांना यश. यापूर्वी अन्य दोन संशयीताना पर्वरी पोलिसांनी केली होती अटक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: 58 वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये 'चक दे इंडिया', इंग्रजांना 336 धावांनी चारली पराभवाची धूळ; मालिकेत बरोबरी

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

New Cricket League: क्रिडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! भारतात सुरू होणार आणखी एक टी-20 लीग, 6 संघांमध्ये रंगणार स्पर्धा

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

SCROLL FOR NEXT