Lift Stuck Incident  Dainik Gomantak
गोवा

Lift Rescue: शॉर्टसर्किटने लिफ्ट पडली बंद, चिमुकल्यासह कुटुंब अडीच तास अडकले; मरड-म्हापसा येथील प्रकार

Lift Stuck Accident: लिफ्टची देखभाल पाहणाऱ्या जीएसआयडीसीच्या तंत्रज्ञांना पाचारण केले. तब्बल दोन तासांनी ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनाही लिफ्ट सुरू करणे शक्य झाले नाही. शेवटी त्यांनी लिफ्ट खेचून खाली आणली.

Sameer Panditrao

म्हापसा: मरड-म्हापसा येथील उपनिबंधक कार्यालय असलेल्या एसआर इमारतीमधील लिफ्ट बंद पडल्याने सात वर्षीय मुलासमवेत अ‍ॅड. कळंगुटकर दाम्पत्य अडकले. तब्बल अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या कुटुंबाला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले.

ही घटना शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. एसआर बिल्डींगच्या दुसऱ्या मजल्यावर अ‍ॅड. सर्वेश कळंगुटकर आणि अ‍ॅड. मीनल कळंगुटकर यांचे कार्यालय आहे. ते मुलासमवेत सायंकाळी चहा घेण्यासाठी इमारतीमधून खाली आले होते.

परत कार्यालयात जाताना अचानक शार्टसर्किट झाले आणि वीजपुरवठा बंद झाला. काही मिनिटांनी वीजपुरवठा सुरळीत झाला. मात्र, लिफ्ट मध्येच बंद पडली आणि कळंगुटकर कुटुंब लिफ्टमध्ये अडकले.

या घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. शाहीद खान, सूरज शेटगावकर, जयेश कांदोळकर, स्वप्नेश कळंगुटकर, दिप्तेश गावडे, परेश मांद्रेकर, साईदत्त आरोलकर, भगवान पाळणी या जवानांनी पोलिसांच्या मदतीने लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना ते शक्य झाले नाही.

त्यानंतर लिफ्टची देखभाल पाहणाऱ्या जीएसआयडीसीच्या तंत्रज्ञांना पाचारण केले. तब्बल दोन तासांनी ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनाही लिफ्ट सुरू करणे शक्य झाले नाही. शेवटी त्यांनी लिफ्ट खेचून खाली आणली आणि अग्निशमन दलाच्या मदतीने दरवाजा ओढून अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढले. तब्बल अडीच तासांनी कळंगुटकर कुटुंबाने सुटकेचा निःश्वास घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 2026: शनिदेवांच्या लाडक्या राशीवर होणार धनाचा वर्षाव! शुक्राच्या साथीनं चमकणार नशीब; नोकरीत बढती अन् व्यापारात दुप्पट नफा

मानवजातीच्या विनाशाची नवी वेळ निश्चित! 100 कोटी वर्षांनंतर सजीव सृष्टीचा होणार 'द एंड'; नासाच्या सुपरकॉम्प्युटरचा थरारक अंदाज

एलपीजी सिलेंडर की पीएनजी? स्मार्ट किचनसाठी निवडा योग्य पर्याय; स्टोरेजच्या कटकटीपासून ते बुकिंगच्या वेटिंगपर्यंत सिलेंडरची 5 आव्हाने

Global Terrorist Amir Hamza Attack: लाहोरमध्ये रक्ताचा सडा! हाफिज सईदचा विश्वासू आमीर हमजावर खूनी हल्ला; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Goa IPL Betting Racket Busted: 6 जणांना बेड्या, 50 एटीएम कार्ड अन् 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त; सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT