Mapusa Youth Attack Dainik Gomantak
गोवा

Mapusa: जीवे मारण्याची धमकी दिली, तरुणावर केला दगडाने हल्ला; फरार संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद

Mapusa Youth Attack: संशयित विल्सन फर्नांडिस याने वैयक्तिक वादातून फिर्यादी रोहन यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने रोहन यांच्यावर दगडाने हल्ला केला.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: वैयक्तिक वादाच्या कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ करत, त्याला दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी ''पिटू'' उर्फ विल्सन फर्नांडिस याच्यावर गुन्हा दाखल केला.

रोहन कोरगावकर (काणका, बार्देश) हे फिर्यादी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २१ मार्च रोजी काणका येथील एका जिमजवळ घडली. संशयित विल्सन फर्नांडिस याने वैयक्तिक वादातून फिर्यादी रोहन यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने रोहन यांच्यावर दगडाने हल्ला केला, ज्यामध्ये रोहन यांना शारीरिक दुखापत झाली आहे.

तसेच संशयिताने रोहन यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या मालकीच्या स्कूटरची नासधूस केली. यात २०,००० रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. म्हापसा पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत संशयिताविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. संशयित फरार आहे.

वेळ्ळी येथील चोरीप्रकरणी गुन्हा दाखल

वेळ्ळी येथे एका अज्ञात महिलेने भांडी व अन्य वस्तू घेऊन २२,६०० रुपयांचा माल चोरून नेला. या प्रकरणी ज्यो मास्कारेन्स यांनी कुंकळ्ली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. उपनिरीक्षक सुहास वेळीप पुढील तपास करीत आहेत. अज्ञात आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने सांगितले की, एक अज्ञात महिला त्यांच्या मालमत्तेत शिरली व तिने बुलेट सायलेन्सर, तांब्याची भांडी, इस्त्री व अन्य वस्तू चोरी केल्यावर एका रिक्षातून माल घेऊन पसार झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: लखनौ-आग्रा एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली डबल डेकर बस उलटली; 6 जणांचा मृत्यू, 19 जखमी

IPL Qualifier 1 Bengaluru vs Gujarat: गुजरातचं टेन्शन वाढलं! क्वालिफायर-1 पूर्वी RCB च्या संघात 'या' मॅचविनर खेळाडूची एन्ट्री; बंगळुरूला मोठा दिलासा

Horoscope: मंगळवारचा दिवस 'या' राशींसाठी ठरणार वरदान; बजरंगबलीच्या आशीर्वादाने उघडणार नशिबाचे टाळे! सर्व कामं होणार यशस्वी

Goa Politics: 'आरजी'मधील घडामोडी गोव्यातील परंपरेला धरूनच

पंधरा वर्षांनंतर राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण!

SCROLL FOR NEXT