VIDEO: लखनौ-आग्रा एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली डबल डेकर बस उलटली; 6 जणांचा मृत्यू, 19 जखमी

Agra Lucknow Expressway Accident: उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातून एक अतिशय हृदयद्रावक बातमी समोर आली आहे.
Agra Lucknow Expressway Accident
Agra Lucknow Expressway AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातून एक अतिशय हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. लखनौ-आग्रा एक्सप्रेसवेवर मंगळवारी पहाटेच्या सुमारास प्रवाशांनी गच्च भरलेली एक डबल डेकर बस अनियंत्रित होऊन उलटली. या भीषण अपघातात ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य १९ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात औरास पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक्सप्रेसवेच्या २६२ व्या किलोमीटरवर झाला. ही बस दिल्लीहून गोरखपूरच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की घटनास्थळी एकच चीख-पुकार आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

चालकाला डुलकी लागल्याने अनियंत्रित झाली बस

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही खासगी डबल डेकर बस रात्रीच्या प्रवासानंतर पहाटेच्या सुमारास उन्नाव जिल्ह्यातील औरास परिसरात पोहोचली होती. यावेळी बस चालकाचा डुलकी आल्याने वेगात असलेल्या बसवरील त्याचे नियंत्रण सुटले.

अनियंत्रित झालेली ही बस आधी एक्सप्रेसवेच्या बाजूला असलेल्या लोखंडी रेलिंगला प्रचंड वेगाने धडकली आणि त्यानंतर रस्त्यावरच पलटी झाली. ही धडक इतकी जोरदार होती की बसच्या काचा फुटून अनेक प्रवासी थेट रस्त्यावर फेकले गेले. बाहेर फेकल्या गेल्यामुळे अनेक प्रवाशांना गंभीर दुखापत झाली.

Agra Lucknow Expressway Accident
Goa Politics: 'आरजी'मधील घडामोडी गोव्यातील परंपरेला धरूनच

युद्धपातळीवर बचावकार्य

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, यूपीडाची (UPEIDA) सुरक्षा पथके आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी तातडीने रुग्णवाहिकांसह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी बसच्या आत आणि सीटखाली अडकलेल्या प्रवाशांना कशाबशा प्रकारे बाहेर काढले. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, यातील अनेकांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना पुढील चांगल्या उपचारासाठी लखनौच्या ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे.

Agra Lucknow Expressway Accident
Goa Beach Tourism: पांढरी शुभ्र मखमली वाळू, आकाशात रंगांची उधळण आणि समुद्राची गाज; गोव्यातील जादुई बीच घालतो साद

वेगाचा अतिरेक

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत ६ लोकांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे. प्रशासनाने सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बसचा वेग खूप जास्त होता. अचानक बस रस्त्यावर हेलकावे खाऊ लागली आणि क्षणार्धात रेलिंग तोडून पलटी झाली. अपघातानंतर एक्सप्रेसवेवरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती, जी पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त बस बाजूला करून पूर्ववत केली आहे. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com