Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

'माझी राजकारण्‍यांकडे ओळख आहे'! असे सांगून तरुणींवर पाडायचा छाप; लैंगिक अत्‍याचार प्रकरणातील तरुणावर आणखी गुन्हे असल्याचा संशय

Mapusa Crime: यापूर्वीही या संशयितावर लैंगिक अत्‍याचाराचे एक प्रकरण नोंद झाले होते, अशी माहिती पुढे आली आहे. मात्र, अजून या प्रकरणात आम्‍ही तपास करत आहोत, अशी माहिती पाेलिसांकडून मिळाली.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: चांगल्‍या पगाराची नोकरी देतो असे सांगून म्‍हापसा येथील एका युवतीवर लैंगिक अत्‍याचार केल्‍याच्‍या तसेच खंडणी वसूल केल्‍याच्‍या आराेपाखाली अटक करण्‍यात आलेल्‍या राज प्रशांत ठाकूर याच्‍याविराेधात यापूर्वी आणखी काही गुन्‍हे नोंद झाले आहेत का, याचा तपास फातोर्डा पोलिस करत आहेत.

यापूर्वीही या संशयितावर लैंगिक अत्‍याचाराचे एक प्रकरण नोंद झाले होते, अशी माहिती पुढे आली आहे. मात्र, अजून या प्रकरणात आम्‍ही तपास करत आहोत, अशी माहिती पाेलिसांकडून मिळाली. म्‍हापसा येथील एका युवतीला राज ठाकूर याने मडगावात आणून लैंगिक अत्‍याचार केले व तिचा विवस्‍त्रावस्‍थेतला व्‍हिडिओ शूट केला, असा त्‍याच्‍यावर आरोप आहे.

या युवतीकडून त्‍याने वेगवेगळ्‍या कारणास्‍तव ३० ते ४० लाख रुपये खंडणीच्‍या रूपात वसूल केले, अशीही तक्रार आहे. या संशयिताच्‍या विरोधात फातोर्डा पोलिसांत गुन्‍हा नोंद झाल्‍यानंतर तो गोव्‍यातून फरार झाला होता. दोन दिवसांपूर्वी त्‍याला पुण्‍यात अटक केली होती. शुक्रवारी मडगाव न्‍यायालयासमोर हजर केले असता सहा दिवसांच्‍या पोलिस कोठडीचा रिमांड त्‍याला दिला हाेता.

संशयित राजने आणखी काही युवतींना अशाप्रकारे लुबाडल्याची माहिती पुढे आली आहे. आपल्‍या आस्‍थापनात मोठ्या रकमेची नोकरी देताे असे सांगून तो युवतींना आपल्‍या जाळ्‍यात ओढत असे. त्‍यानंतर महाराष्‍ट्र व गोव्‍यातील राजकारण्‍यांकडे ओळख आहे, असे सांगून तो त्‍यांच्‍यावर आपली छाप पाडत असे.

पनवेलच्‍या आमदाराशी आपले संबंध आहेत, असे राजने सांगितले हाेते. पण त्‍याला अटक केल्‍यानंतर या आमदाराशी आपले कुठलेही संबंध नाहीत, असे त्‍याने पोलिसांना सांगितले, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. लोकांवर छाप पाडण्‍यासाठीच तो अशी खोटी माहिती देत होता हेही आता समोर आले आहे.

नंतरच माहिती स्‍पष्‍ट करू!

याच संशयिताविरोधात २०१८ मध्‍ये आणखी एक अशाचप्रकारचा गुन्‍हा नाेंद झाला होता, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, पोलिसांकडून त्‍याची खात्री पटवली गेलेली नाही. राजसंदर्भात आणखी कुठे गुन्‍हे नोंद झाले आहेत का, याची माहिती आम्‍ही मागितली आहे. ही माहिती मिळाल्‍यावरच यासंदर्भात आम्‍ही काय ते स्‍पष्‍ट करू, असे दक्षिण गोव्‍याचे पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Labh Drishti Yog 2026: करिअरमध्ये अचानक मिळणार मोठी संधी! सूर्य-गुरुच्या योगानं 'या' राशींचा होणार भाग्योदय; ग्रहांची चाल बदलणार तुमचं आयुष्य

Goa Crime: 'त्या' डॉक्टर महिलेला मिळाला न्याय! विनयभंग करणाऱ्या नराधमांना कोर्टचा दणका; दळवी, कांदोळकरांना ठोठावली कारावासाची शिक्षा

Margao Sopo Tax Protes: मालवाहू वाहनांवरील सोपो वसुली रद्द करा! व्यापारी संघटनेची आक्रमक मागणी; मडगावात वसुली ‘माफिया पद्धतीने’ होतेय

गोवा हीच एक प्रयोगशाळा! संपादकीय

Viral Video: "शाळाच तोडून टाकीन!" छोट्या डॉनची थेट मास्तरांना धमकी, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरीही हक्काबक्का; म्हणाले, 'बच्चा खतरनाक है भाई'

SCROLL FOR NEXT