Mapusa Market Dainik Gomantak
गोवा

Mapusa Market: म्हापसा मार्केटमधील जागा बदलणार; व्यापाऱ्यांचा आक्षेप

Mapusa Market: म्हापसा येथील मार्केटमध्ये भूमिगत वीज वाहिन्यांचे फीडर पिलर उभारणी तसेच वीज पुरवठा वितरण युनिटचे काम सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

Mapusa Market: म्हापसा येथील मार्केटमध्ये भूमिगत वीज वाहिन्यांचे फीडर पिलर उभारणी तसेच वीज पुरवठा वितरण युनिटचे काम सुरू आहे. मात्र, गटारांवर उभारलेल्या फीडरच्या सिमेंट खांबला व्यापारीवर्गाने आक्षेप घेतला आहे. यामुळे पावसाळ्यात बाजारपेठेत पूरसदृश स्थिती उद्भवेल, अशी भीती व्यक्त केली होती.

मंगळवारी वीज खाते, पालिका व म्हापसा व्यापारी संघटनेच्या सदस्यांनी मार्केटमध्ये संयुक्त पाहणी केली व फीडरच्या जागेत बदल करण्याचा निर्णय घेतला. मार्केटमध्ये जवळपास ६२ फिडर पिलर उभारले जाणार आहेत. यावेळी वीज अभियंता सावियो फर्नांडिस, पालिका अभियंता प्रशांत नागवेकर आदी उपस्थित होते.

कंपनीची सारवासारव

वीज खात्याने म्हापसा शहरात स्वस्तिक इन्फ्रा प्रा.लि. (एआयपीएल) या कंत्राटदार कंपनीतर्फे भूमिगत वीज वाहिन्यांद्वारे वीज पुरवठा देण्याचे काम सोपविले आहे. मध्यंतरी, संयुक्त पाहणी करून हे युनिट व फीडर पिलर उभारण्याची जागा निश्चित केली होती.

तेव्हा गटारांवर युनिट न बसविण्याची सूचना व्यापाऱ्यांनी केली होती. तरीही कंपनीने पिलरसाठी गटारांवर सिमेंट खांब उभारले. याविषयी संबंधितांकडून जागेचा अभाव सांगत कृतीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाढता आक्षेप व स्थिती पाहून बहुतांश युनिट तसेच फीडर पिलरची जागा बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT