Minister Rohan Khanwte inspected the work along with Salgaon MLA Kedar Naik. Dainik Gomantak
गोवा

Mapusa Water Shortage : पर्वरी, साळगावमध्ये पाणीटंचाई

अधिकाऱ्यांना सूचना : जलवाहिनीच्या कामाची नेत्यांकडून पाहणी

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा : पर्यटनमंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांच्यासह साळगावचे आमदार केदार नाईक, जलस्त्रोत अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी धुळेर-म्हापसा येथे जलवाहिनी टाकण्याच्या सुरू असलेल्या तसेच येत्या दहा दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश जलस्त्रोत अधिकाऱ्यांना दिले. जेणेकरून कच्च्या पाण्याचा पुरवठा पर्वरी जलशुद्धीकरण प्रकल्पास तातडीने केला जाऊ शकतो.

यासंदर्भात मंत्री खंवटे यांनी पाणीटंचाईचा मुद्दा जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्याकडे मांडला असून अस्नोडा जलशुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्पास कच्चा पाणीपुरवठा वाढवण्यास सांगितले आहे. तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांच्याकडे पर्वरी व साळगाव मतदारसंघाला प्रक्रिया केलेले पाणीपुरवठा वितरणाबाबतचा विषय उपस्थित केला.

मंगळवारी, सायंकाळी मंत्री खंवटे यांच्यासह साळगावचे आमदार केदार नाईक यांच्यासमवेत जलस्त्रोत विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचायत सदस्यांनी धुळेरला भेट दिली. जिथे सध्या तिलारी पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. जी ग्रीन पार्क पंपिंग स्टेशनला जोडली जाईल व पुढे पर्वरी ट्रीटमेंट प्लांटला कच्चा (रॉ) पाणीपुरवठा करेल. यावेळी मंत्री, आमदारांनी संबंधितांना काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले की, पर्वरी व साळगाव येथे पाण्याची मोठी समस्या आहे. अस्नोडा प्रक्रिया प्रकल्पात १६० एलएलडी पाण्याची क्षमता आहे, परंतु आम्हाला १२० एमएलडी प्रक्रिया केलेले पाणी मिळते.

दोन दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा

सार्वजनिक बांधकाम खात्यात समन्वयचा अभाव असल्याची माहिती मला मंत्र्यांकडूनच मिळाली. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी पाण्याच्या टँकर सेवेवर सध्या भर दिला आहे आणि आम्ही अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पामधून येणाऱ्या पाण्याचे योग्य वितरण करण्यास सांगितले आहे. प्रक्रिया केलेले पाणी सोडल्यानंतर दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा असल्याचे खंवटे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'त्या' रशियन पर्यटकाने केले 15 खून? सीरियल किलरने उडविली गोवा पोलिसांची झोप; संशयिताला 14 दिवसांची पोलिस कोठडी

Weekly Horoscope: धन, यश आणि मान-सन्मान देणारा आठवडा! 'या' राशींवर लक्ष्मीची विशेष कृपा; वाचा संपूर्ण माहिती

Hadkolan Goa: रेड्यांच्या जत्रेसाठी सुप्रसिद्ध असलेले, निसर्ग सौंदर्याने सजलेलले गाव 'अडकोळण'

Iran America Tension: "ट्रम्प इराणचे गुन्हेगार...!", खामेनेई यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षावर ठेवला विध्वंसाचा ठपका; जागतिक राजकारणात पुन्हा खळबळ

Goa Crime: आधी प्रेम, मग अनन्वित अत्याचार अन् शेवटी गळा चिरला, रशियन सिरीयल किलरच्या क्रूरतेनं हादरला गोवा; लवकरच उलघडणार 10 तरुणींच्या मृत्यूचं गूढ?

SCROLL FOR NEXT