Mapusa Urban Cooperative Bank 
गोवा

म्हापसा अर्बन बँकेकडे 18 कोटींहून अधिक रक्कमेच्या बेवारस ठेवी, दावा करण्यासाठी 40 दिवसांची मुदत

बँकेत 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम असलेल्या खातेदारांना पैसे परत मिळत नसल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Pramod Yadav

Mapusa Urban Cooperative Bank: ठेवीदारांची ओळख नसलेल्या तब्बल 18 कोटींहून अधिक रक्कमेच्या ठेवी म्हापसा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेकडे (MUCB) आहेत. ही रक्कम बँकेचा परवाना रद्द झाल्यानंतर बँकेकडे असलेल्या एकूण निधीपैकी 8 टक्के आहे.

या ठेवीदारांचा शोध बँकेकडून सुरू आहे. दुसरीकडे, बँकेत 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम असलेल्या खातेदारांना पैसे परत मिळत नसल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

बँकेकडे सुमारे 8 टक्के ठेवी हक्क नसलेल्या आहेत. तीन वर्षे झाली, या रक्कमेबाबत कोणताही दावा करण्यात आलेला नाही. आम्ही तीनवेळा जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ठेवींवर दावा करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. अशी माहिती म्हापसा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे लिक्विडेटर अँथनी डी सा यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे.

ठेवींवर 146 व्यक्तींनी सुमारे 1.1 कोटी रुपयांसाठी दावा केला, पण त्यांच्याकडून दावा सिद्ध करण्यासाठी कागदपत्र दाखल करता आली नाहीत. तर, काही खातेदारांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांनी दावे सादर केले आहेत. असेही डी सा म्हणाले.

एप्रिल 2020 मध्ये बँकेचा परवाना रद्द झाला तेव्हा MUCB कडे 356 कोटी रुपये ठेवी होत्या. या ठेवींपैकी 254 कोटी रुपयांवर 66,927 ठेवीदारांनी दावा केला आहे.

एमयूसीबीने 33,124 दावेदारांनी सादर केलेली कागदपत्रे वैध असल्याचे आढळल्यानंतर 249 कोटी रुपये वितरित केले आहेत. अशी माहिती बँकेच्या वतीने देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: "माझे घर" योजना सप्टेंबरपासून लागू - मुख्यमंत्री

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

Virat Kohli: 18 ऑगस्ट, 18 नंबर जर्सी! 17 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुरु झाला कोहलीचा ‘किंग’ बनण्याचा प्रवास; जाणून घ्या विराटचे रेकॉर्ड्स

MLA Disqualification Petition: गोव्यातील ‘त्या’ 8 आमदारांच्या भवितव्याचं काय? चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

Goa Opinion: देशाचा असो वा गोव्याचा असो, शेवटी हुकमाचा एक्का हा मतदार असतो..

SCROLL FOR NEXT