Mapusa Traffic Police Dainik Gomantak
गोवा

Mapusa Traffic Police: म्हापशाच्या रस्त्यांवरील ट्रॅफिक जॅमला बसणार ब्रेक! 'वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवा!' उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक

Student Safety In Mapusa: शाळा सुटण्याच्या वेळेचे योग्य व्यवस्थापन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: शहरात गर्दीच्या वेळी विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हापसा वाहतूक पोलिस, शाळा, महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी उपसभापती जोशुआ डिसोझा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस वाहतूक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुदेश नार्वेकर, वाहतूक पोलिस निरीक्षक मार्लन डिसोझा यांच्यासह इतर प्रमुख पोलिस अधिकारी व विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी एकाच वेळी बाहेर पडल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी व वाहतूक कोंडी निर्माण होते.

यावर तोडगा काढण्यासाठी शाळा सुटण्याच्या वेळेचे योग्य व्यवस्थापन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पालक-शिक्षक संघ, शिक्षक, विद्यार्थी स्वयंसेवक आणि ट्रॅफिक वॉर्डन्स यांची मदत घेतली जाणार आहे. त्यांच्यातील परस्पर समन्वयातून गर्दीच्या वेळी रस्त्यावरील रहदारीचे योग्य नियंत्रण केले जाईल.

सर्व उपाययोजना करू!

शाळा, वाहतूक प्रशासन आणि स्वयंसेवक यांच्यात उत्तम समन्वय निर्माण करून हा प्रश्न सोडवला जाईल. शहरातील वाहतूक सुरळीत राखणे आणि विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित करणे याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असून त्यादृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, असे उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी बैठकीनंतर बोलताना स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT