Mapusa Dainik Gomantak
गोवा

Mapusa: ..तोडगा काढा अन्यथा काळे झेंडे दाखवू! म्हापसा व्यापारी संघटनेचा इशारा; आमदारांसह सरकारला दिला अल्टिमेटम

Mapusa Traders Association: गुरुवारी, रात्री उशिरा म्हापसा मार्केटच्या प्रवेशद्वारावर घेतलेल्या तातडीच्या बैठकीत व्यापाऱ्यांनी आमदारांसह सरकारला अल्टिमेटम दिले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: येथील मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर स्थानिक आमदार जोशुआ डिसोझा तसेच पालिकेने जातीने लक्ष घालावे. येत्या १५ डिसेंबरपर्यंत या प्रश्नांवर तोडगा काढावा, अन्यथा गोवा मुक्तिदिनी म्हणजे १९ डिसेंबरला काळे झेंडे दाखवून आम्ही निषेध नोंदविणार, असा सज्जड इशारा म्हापसा व्यापारी संघटनेने दिला. दरम्यान, शुक्रवारी व्यापाऱ्यांनी पालिका मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांचीही भेट घेतली.

गुरुवारी, रात्री उशिरा म्हापसा मार्केटच्या प्रवेशद्वारावर घेतलेल्या तातडीच्या बैठकीत व्यापाऱ्यांनी आमदारांसह सरकारला अल्टिमेटम दिले आहे. संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र फळारी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी मोठ्या संख्येने व्यापारीवर्ग हजर होते.

म्हापसा पालिकांच्या मालकीच्या दुकानांच्या भाडेकरू करारपत्र नूतनीकरण, रक्ताच्या नात्यातील दुकानांचे हस्तांतरण तसेच थकीत विविध कर वसुलीसंदर्भसह इतर मागण्यांवर व्यापाऱ्यांना पालिकेकडून अद्याप दिलासा मिळालेला नाही, याबाबत बैठकीत जोरदार चर्चा करण्यात आली तसेच काही व्यापाऱ्यांना पालिकेने नोटिसा जारी केल्या आहेत, याबाब व्यापाऱ्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.

नाहक त्रास...

अनेक व्यापाऱ्यांनी बैठकीत आपले मनोगत व्यक्त केले. आम्ही व्यवसाय करुन, उदरनिवार्ह चालवतो. आम्ही सरकारकडे नोकऱ्या मागण्यांसाठी गेलो नाही. तरीही, सरकारकडून आम्हाला नाहक त्रास दिला जात आहे. त्यामुळे गरज पडल्यास आंदोलन किंवा रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा विषय लोकप्रतिनिधी व पालिकेने व्यापाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी यावेळी केली.

व्यापाऱ्यांचा हा प्रश्न २०१८ पासून प्रलंबित आहे. वेळोवेळी व्यापारी संघटनेने पालिका तसेच आमदारांकडे पाठपुरावा केला आहे. तरीही, आम्हाला दिलासा मिळालेला नाही. येत्या १५ डिसेंबरपर्यंत व्यापाऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करून आमदार हे म्हापसेकर म्हणजे व्यापाऱ्यांचेच आहे हे त्यांनी सिद्ध करावे अन्यथा १९ डिसेंबरला काळे झेंडे दाखवून आम्ही व्यापारी वर्ग निषेध नोंदविणार.

- जितेंद्र फळारी, अध्यक्ष, म्हापसा व्यापारी संघटना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Protest: 'चिंबल' प्रश्नाचे काय होणार? राज्याचे लक्ष लागून; सरकार 2 दिवसात निर्णय जाहीर करण्याची शक्यता

Russian Killer Goa: 'तो' रशियन किलर राहिला होता गुहेत! अनेक राज्यात होते वास्तव्य; नेमके किती खून केले याचा तपास सुरु

मराठी राजभाषेसाठी मतभेद विसरून एकत्र येऊ! गोव्यात संघटित संघर्षाचा निर्धार; माशेल येथील तिसऱ्या साहित्य संमेलनात ठराव

Horoscope 19 January 2026: सोमवारी 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस; मकर-मीनसाठी काळ ठरेल भाग्यवान

Damodar Temple Fatorda: लोकांच्या हाकेला पावणारा देव! श्री दामोदर देवस्थान (लिंग), फातोर्डा वार्षिकोत्सव

SCROLL FOR NEXT