Mapusa Market Dainik Gomantak
गोवा

Mapusa Market: व्यापारी परवान्याचे नूतनीकरण करा! म्हापसा व्यापारी संघटनेचे नगराध्यक्षांना निवेदन

Mapusa Market License Issue: व्यापार परवान्याचे नूतनीकरण पालिकेने प्रलंबित ठेवले असून वैध व्यापार परवाना अभावी व्यापारी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: येथील बाजारपेठेतील दुकानांच्या व्यापार परवान्याचे नूतनीकरण पालिकेने प्रलंबित ठेवले असून वैध व्यापार परवाना अभावी व्यापारी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. या परवान्याचे नूतनीकरण लवकर करून व्यापारी वर्गाला दिलासा द्यावा, अशी मागणी म्हापसा व्यापारी संघटनेने नगराध्यक्षांकडे निवेदन सादर करून केली आहे.

मंगळवारी नगराध्यक्षा डॉ. नूतन बिचोलकर यांची व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद सावंत व सचिव सिद्धेश राऊत यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी व्यापारी संघटनेचे इतर पदाधिकारी, उपनगराध्यक्ष सुशांत हरमलकर व इतर नगरसेवक उपस्थित होते.

म्हापसा पालिकेकडून दरवर्षी आवश्यक शुल्क भरून आमच्या व्यापार परवान्याचे (ट्रेड लायसन्स) नूतनीकरण केले जात होते. यावर्षी पालिकेकडून लेखी अर्ज सादर करण्याची अनावश्यक अशी औपचारिकता सुरू करण्यात आली. त्यानुसार व्यापारी वर्गाने परवान्या नुतनीकरणासाठी हे अर्ज केले आहेत.

तरीही या अर्जावर वेळेत प्रक्रिया झालेली नाही. एप्रिल व मे महिन्यापासून अर्ज प्रलंबित आहेत. परिणामी व्यापाऱ्यांकडे वैध व्यापार परवाना नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना भुर्दंड सोसावा लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT