Sudesh Mayenkar | Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa Farmer: बार्देशमध्ये शेतकऱ्यांकडून कंपनीची स्थापना

Goa Farmer: दहा शेतकरी एकत्र : अध्यक्षपदी सुदेश मयेकरांची निवड

दैनिक गोमन्तक

Goa Farmer: बार्देश तालुक्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या विविध योजनांचा थेट लाभ उपलब्ध व्हावा. त्यांनी घेतलेल्या पिकाचा थेट लाभ व्हावा. यासाठी 10 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्वतःची अशी बार्देश तालुका शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या अध्यक्षपदी कळंगुट पंचायतीचे माजी उपसरपंच तसेच सक्रिय शेतकरी सुदेश मयेकर यांची नियुक्ती केली आहे.

या माध्यमातून शेतीसाठी शेतकऱ्यांना आवश्यक अवजारे, बियाणे, खते, कर्ज , विमा, सामूहिक शेती मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने या कंपनीची स्थापना केल्याची माहिती सुदेश मयेकर यांनी दिली.

शेतीबरोबर इतर उद्योग आणि समूह शेती करण्याचे फायदे या माध्यमातून शेतकऱ्यास ही कंपनी प्रेरणादायी तसेच लाभदायी ठरणार आहे. प्रक्रिया उद्योगातून सभासदांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. आधुनिक शेती तंत्रज्ञान, आर्थिक नियोजनासह शेतीसंबंधी प्रशिक्षण दिले जाऊ शकते. संस्थेच्या नफ्यातून सभासदांना लाभांश सुद्धा दिला जाऊ शकतो. तसेच इतर विविध योजनांचा थेट लाभ शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो.

शेतकरी उत्पादक कंपनी हा केंद्र सरकारचा उपक्रम असल्याचे मयेकर म्हणाले. बार्देश तालुक्यात 10 शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. कंपनीत फक्त शेतकरी भागधारक होऊ शकतो आणि तो लाभ घेऊ शकतो. केंद्र सरकाराकडून 3 वर्षे सहकार्य मिळेल तर उत्पादन कंपनीची स्थापना करण्यासाठी नाबार्डकडून व्याज मुक्त कर्ज सुद्धा दिले जाते.

एक हजार सभासदांची नोंदणी होणार

सध्या राज्यात अनेक शेती पडीक ठेवण्यात आली आहेत. या शेतीत पुन्हा लागवड व्हावी, हा सुद्धा एक हेतू आहे. शेतकरी लागवडीसाठी तयार नसल्यास कंपनीमार्फत शेतात लागवड केली जाऊ शकते. कंपनी स्थापनेची प्रक्रिया पूर्ण झाली असून सुमारे 1 हजार शेतकऱ्यांची भागदारक म्हणून नोंद करण्याचा कंपनी प्रयत्नात राहणार असल्याचे अध्यक्ष मयेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT